वस्त्रोद्योग अडचणीत : यंत्रमाग व्यवसायाचे प्रश्न शासनाकडून बेदखल

कोल्हापूर : शेतीखालोखाल रोजगार देणारा उद्योग म्हणून यंत्रमाग व्यवसायाची ख्याती आहे; पण सततच्या संकटांमुळे हा उद्योग समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. या व्यवसायावर हजारो कुटुंबांची रोजीरोटी अवलंबून आहे. मात्र, या उद्योगाच्या समस्याशासनस्तरावरबेदखल केल्या जात असल्यानेच शेतकरी आत्महत्यांपाठोपाठ आता या व्यवसायातही आत्महत्त्यांचे लोण सुरू झाले आहे. उद्योजक अमर डोंगरे (Amar Dongre) आत्महत्या प्रकरणानंतर तरी राज्यकत्यांचे डोळे उघडणार का, असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहर यंत्रमाग उद्योगाचे मोठे केंद्र आहे. शहरातील प्रमुख अर्थकारण यंत्रमाग उद्योगाशीच निगडित आहे. शहरातील यंत्रमाग व्यवसायावर अनेक घटक गतीवरच शहराची आर्थिक उलाढालही अवलंबून आहे. कापड आयात-निर्यात धोरण ठरविणे, सुताचे दर स्थिर ठेवणे, सुताचा जीवनावश्यक वस्तू कायद्यामध्ये समावेश करणे, साध्या यंत्रमागावरील कापडाला आरक्षण जाहीर करणे, कापडासाठीही हमीभाव ठरवणे, वीज बिलातील सवलत, कर्जाच्या व्याजावरील सवलत असे अनेक प्रश्न आजही उद्योगापुढे ‘आ’वासून उभे आहेत.

यंत्रमाग व्यवसाय आर्थिक संकटात सापडला उद्योगाची वाटचाल कायम करण्यासाठी यंत्रमाग व्यवसायच घाट्यात गेला आहे. अवलंबून असल्याने यंत्रमाग व्यवसायाच्या कृत्रिमरीत्या वाढणाऱ्या सूतदराचा प्रश्न मागणी, वाढीव वीजबिल, कामगारांचा पगार आणि अपेक्षित भाव नसताना आहे. कोरोनाच्या संकटावर मात करीत सुताच्या दरातील वाढीमुळे यंत्रमागधारकांची धडपड सुरू असताना वाढते सूतदर, कापडाला नसलेली मागणी आदी यंत्रमागधारकांसमोर मोठे प्रश्न आहेत. कापडाला मागणी जेमतेम असताना खर्चाचा ताळमेळ घालताना यंत्रमागधारकांना नाकीनऊ येत आहे. सूत रोखीने खरेदी करायचे आणि कापडाची रक्कम मात्र पेमेंटधारा पद्धतीने स्वीकारायची, असा पायंडा व्यापाऱ्यांनी पाडला आहे. त्यामुळे कारखानदारांना आर्थिक बोजा व व्याजाचा भुर्दंड सोसावा लागत आहे.

लॉकडाऊननंतर कापड विलाची रक्कम विलंबाने हाती मिळत असल्याने यंत्रमागधारकांना आर्थिक गणिते घालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. लॉकडाऊनच्या काळातील वीज बिलातील स्थिर आकार सहा महिन्यांसाठी रद्द करणे, २७ अश्वशक्तीवरील लघुदाब यंत्रमागधारकांच्या वीजबिलाची सवलत, ५ टक्के कर्जाच्या व्याजदरातील सबलत, आदींसह राज्याबरोबरच केंद्राच्या अखत्यारीतही विविध प्रश्न आजही सुटलेले नसल्याने उद्योगाची वाटचाल बिकट बनली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER