ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी चाचणीचे मार्गदर्शक तत्त्व

Test guidelines for travelers from the UK

मुंबई : कोविड – १९ चा (Covid-19) नवा विषाणू ब्रिटनमध्ये (Britain) आढळला आहे. त्याची संक्रमण क्षमता जुन्या विषाणूपेक्षा ७० टक्के जास्त आहे. युरोपमधील (UK) इतरही देशांत  या विषाणूचे संक्रमण झाल्याची शंका असल्याने युरोपमधील व जगातील इतरही देश खबरदारी म्हणून निर्बंध लागू करत आहेत.

भारताने ३१ डिसेंबरपर्यंत ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या विमानांवर प्रतिबंध लावला आहे. जर्मनी, बल्गेरिया, आयरिश प्रजासत्ताक, तुर्कस्तान व कॅनडा यांनीही ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवरही बंदी घातली आहे. ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरू असून आरटी पीसीआर चाचण्या सक्तीच्या आहेत. ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांवर ज्या देशांनी निर्बंध लादले त्यात हाँगकाँग, इस्रायल, इराण, क्रोएशिया, अर्जेटिना, चिली, मोरोक्को व कुवेत यांचा समावेश आहे. प्रतिबंध येणाऱ्या प्रवाशांना स्वखर्चाने सात  दिवस संस्थात्मक क्वारंटाईन राहावे लागेल.

ज्या प्रवाशात कोरोनाची लक्षणे आढळतील त्यांना सरळ कोरोना उपचार केंद्रात भरती करण्यात येईल. या प्रवाशांना हॉटेलमध्ये प्रवेश देताना त्यांचे पासपोर्ट हॉटेलमध्ये जमा करून घेण्यात येतील व ते सुटी देताना परत करण्यात येतील. या प्रवाशांची चाचणी व्यवस्थेशी जोडलेल्या खाजगी लॅबोरेटरीजकडून हॉटेलमध्ये करण्यात येईल व त्याचा खर्च प्रवाशांना करावा लागेल.

Check PDF :-  ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी चाचणीचे मार्गदर्शक तत्व

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER