टेरर फंडिंग : मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड जकीउर रहमान लख्वीला १५ वर्षांची शिक्षा

Zakiur Rehman Lakhvi

लाहोर : ए तोयबाचा ऑपरेशन्स कमांडर आणि मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड जकीउर रहमान लख्वीला (Zakiur Rehman Lakhvi ) ‘टेरर फंडिंग’प्रकरणी पाकिस्तानातील न्यायालयाने १५ वर्षांची शिक्षा सुनावली. टेरर फंडिंगसंबंधीत एका प्रकरणात लख्वीला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. लाहोरच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने शुक्रवारी लख्वीला शिक्षा सुनावली.

२००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा लख्वी मास्टरमाइंड आहे. लाहोरमध्ये लख्वीविरोधात टेरर फंडिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो डिस्पेंसरीच्या नावाखाली पैसे जमा करत होता आणि त्या पैशांचा वापर दहशतवादी कृत्यांसाठी करत होता, असा आरोप त्याच्यावर आहे. दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी हा पैसा वापरण्यात येत होता.

संयुक्त राष्ट्रांनीही जकीउर रहमान लख्वीला दहशतवादी घोषित केले होते. मात्र, त्याच्यावर कारवाई होत नव्हती. काळ्या यादीत जाण्याची भीती असल्याने एफएटीएफच्या बैठकीपूर्वी लख्वीला अटक करून पाकिस्तानने त्याच्यावर कारवाई केली आहे. आता न्यायालयाने त्याला १५ वर्षांची शिक्षा सुनावली.

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी हाफीज सईदसोबत जकीउर रहमान लख्वीही मुख्य आरोपी आहे. या प्रकरणी त्याला शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, २०१५ पासून तो जामिनावर आहे. काही दिवसांपूर्वी त्याला अटक करण्यात आल्याने अमेरिकेने समाधान व्यक्त केले होते.

जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) ची बैठक होणार आहे. ही संस्था विविध देशांना दहशतवादाविरोधात लढण्यासाठी निधी पुरवते. दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करत नसल्याने पाकिस्तानला ‘ग्रे लिस्ट’मध्ये टाकण्याचा धोका आहे. त्यामुळे या बैठकीपूर्वी पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात कारवाईला सुरुवात केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER