ऑस्ट्रियामध्ये दहशतवादी हल्ला, अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती

Vienna Terror Attack

व्हिएन्ना : युरोपातील (Europe) ऑस्ट्रियामधील (Austria) व्हिएन्ना (Vienna) शहराच्या मध्यभागी यहुदी उपासनागृहाजवळ झालेल्या गोळीबारात सात जण ठार झाले आहेत. या हल्ल्यात आणखी काही लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सोमवारी संध्याकाळी झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात सात जण ठार झाले असून यामधील एक हल्लेखोर आहे. ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये हा हल्ला झाला आहे. हल्ल्यात अनेकजण जखमी झाले असून पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. व्हिएन्ना पोलिसांनी एका संशयिताला ठार करण्यात आलं असल्याची माहिती ट्विटरवरुन दिली आहे.

एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार, व्हिएन्ना इनर सिटी जिल्ह्यात पोलीस मोठी कारवाई करीत आहेत. अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत आणि परिस्थितीची माहिती घेत आहेत. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, ज्यू यहूदी उपासनागृहाजवळ रस्त्यावर जवळपास ५० गोळ्यांच्या फेऱ्या झाडण्यात आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण सहा ठिकाणी हल्ला झाला. अनेक हल्लेखोरांनी रायफल्सनी गोळीबार केला. गोळीबारात पोलीस अधिकाऱ्यांसह अनेक जण जखमी झाले आहेत. तर एका हल्लेखोराचा खात्मा करण्यात आला आहे.

ऑस्ट्रियाच्या गृहमंत्र्यांनी हा दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता असून लोकांना घऱाबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. दुसर्‍या ट्विटमध्ये व्हिएन्ना पोलिसांनी लोकांना या हल्ल्याबद्दल सावधानतेच्या सूचना दिल्या आहेत. लोकांना खबरदारी घेण्याचा सल्ला देण्याबरोबरच पोलिसांनी अफवांपासून दूर राहण्यासही सांगितले आहे. पोलिसांनी लिहिले की “अजूनही धोका टळलेला नाही. घरी राहा! आपण रस्त्यावर असाल, तर निवारा घ्या! सार्वजनिक ठिकाणांपासून स्वत: ला दूर ठेवा, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करू नका, असं आवाहनही पोलिसांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER