
वर्धा : वर्धा (Wardha) शहरालगत भूगाव येथील उत्तम गाल्व्हा स्टील कंपनीत (Uttam Galva Steel Company) भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. काम करत असताना अचानक ही आग लागली. या आगीत तब्बल २५ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जखमी कामगारांना तातडीने सावंगीच्या दत्ता मेघे रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कंपनीच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून पत्रकारांना धक्काबुक्की करण्यात आली. फर्निशचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या घटनास्थळी सावंगीचे ठाणेदार रेवचंद शिंगनजुडे चमूसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. खासदार रामदास तडस (Ramdas Tadas) यांनी फोनद्वारे संपर्क साधून जखमींची विचारपूस केली तसेच घटनेची शहानिशा करावी, असेही सांगितले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला