राजू शेट्टींसह शेतकरी नेत्यांना ताब्यात घेतल्याने तणाव

Tensions over the arrest of farmer leaders

कोल्हापूर : कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी शनिवारी कोल्हापुरात रास्तारोको करण्यात आला. यावेळी राजू शेट्टी यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेत असताना पोलीस आणि आंदोलकांत झटापट झाल्याने तणाव निर्माण झाला. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिल्यानंतर तणाव निवळला.

माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दाभोळकर कॉर्नर येथे किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने रास्तारोको करण्यात आला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. आंदोलकांनी रस्त्यावर ठाण मांडल्याने कोंडी झाली. यावेळी पोलीसांनी आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली. यावेळी पोलीसांनी आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी सुरु झाली. पोलिसांनी बळाचा वापर करीत राजू शेट्टी यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेत असताना जोरदार झटापट झाली. बंदोबस्तात आंदोलकांना ताब्यात घेवून शाहूपुरी पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER