औरंगाबाद नामांतरवरून आधीच महाविकास आघाडीत तणाव.. आता उस्मानाबादही आलं चर्चेत

Aurangabad-Usmanabad

औरंगाबाद (Aurangabad) मनपा निवडणूकीच्या तोंडावर नामांतराचा मुद्दा ऐरणीवर आलाय. महाविकास आघाडीत शिवसेना नामांतराच्या बाजूने आहे. कॉंग्रेस विरोधात तर राष्ट्रवादीनं नेहमी प्रमाणं मौन बाळगलंय. औरंगाबादच्या नामांतराविरोधात कॉंग्रेस इतकी आक्रमक झाली आहे की महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) तणाव आता समोर दिसतोय. राजीनामा नाट्य रंगलं. औरंगाबदच्या नामांतराच्या मुद्दयावरुन एकीकडं वातावरण तापलं असातानाच मुख्यमंत्र्‍यांच्या ट्विटमुळं उस्मानाबादच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत आलाय.

मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांबद्दलची घोषणा करणाऱ्या सोशल मिडीयाच्या (Social Media) पोस्टमध्ये उस्मानाबदचा उल्लेख धाराशीव करण्यात आला. विशेष म्हणजे ही पोस्ट मुख्यमंत्री कार्यलयाच्या अधिकृत खात्यावरुन शेअर करण्यात आली होती. त्यामुळं उस्मानाबादच्या नामांतराचा विषय पुन्हा चर्चेत आलाय. धाराशीवचं उस्मानाबाद नावं कसं झालं तेच आपण पाहणार आहोत.

इतिहास अभ्यासकांच्या मते मराठवाड्यावर सत्ता गाजवणाऱ्या निझामांनी धाराशीवचे नाव उस्मानाबाद केलंय. ते ही फक्त १०० वर्षांपूर्वी. स्वातंत्र्यपूर्व भारतात हैद्राबादचा सातवा निझाम उस्मान अली खानने धाराशीवचे नाव त्याच्या नावावरुन उस्मानाबाद करण्यात आलं.

धाराशीव नावाचा इतिहास

राष्ट्रकुट राजवंशातील गोविंद तृतीय या राजाने लिहलेल्या ताम्रपटात धाराशीव हे नाव आढळते. तसेच महानूभव पंताच्या साहित्यातही सध्याच्या उस्मानाबादचा उल्लेख धाराशीव आढळतो.

शिवसेना आणि उस्मानाबाद

वर्ष १९९५, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी पत्रकार परिषद घेत होते. इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली; पण एक नाव कानावरती पडलं आणि पत्रकारांनी कान टवकारले. ते नावं होतं धाराशिव. मराठवाड्यातल्या उस्मानाबादच्या नामांतराची ती घोषणा होती. नंतर औरंगाबादच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत  त्यावर शिक्का मोर्तब झालं. या आधी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी याची तुळजापूरच्या जाहीर सभेत घोषणा केली होती. केंद्रात ही युती सत्तेत. नामांतर बिनदिक्कत पार पडेल अशी आशा होती. औरंगाबादच नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचं संभाजी नगर. त्यातल्या त्यात धाराशीव नावाला इतिहास ही होता. त्या ऐतिहासिक नावानं पुन्हा उस्मानाबाद ओळखल जाईल हे जवळपास निश्चित होतं.

संपूर्ण नियमांचा विचार केला गेला पण न्यायालयीन हस्तक्षेपाला सरकाराला सामोरे जावे लागले. १२ जून १९९८ ला नामांतरासाठी जाहीर सुचना आणि हरकती सरकारने मागवल्या. औरंगाबादचे महंमद मुश्ताक आणि उस्मानाबादचे शिक्षक सय्यद खलील या दोखांनी औरंगाबाद उच्च न्यायलायत याचिका दाखल केली. नामांतरासाठी पैसे खर्च होतील. असा युक्तीवाद करण्यात आला होता.

सुरुवातीच्या काळात मुंबईनंतर शिवसेनेला सर्वाधिक मत मिळाली तर उस्मानाबादमध्ये. शिवसेनेला भरभरून देणाऱ्या या जिल्ह्याची जाण ठेवून सेनेनं मागास आणि दुष्काळग्रस्त उस्मानाबादमध्ये भावनिक अस्मितेच राजकारण न करता विकासाच राजकारण करावं, असं स्थानिकांच म्हणनं आहे.

निझामाने अनेक शहरांचं केलं होतं नामांतर

मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांवर निझामाची सत्ता होती. त्याचा उपयोग करत त्याने अनेक शहरांची नावं बदलली. बीडच्या आंबेजोगाई शहराचं नामांतर त्यानं मोमिनाबाद केलं होतं पण लोकांनी हे नाव मान्य केलं नाही. त्यासाठी त्यांना सरकारी स्तराव जाण्याची गरज पडली नाही.

शासकीय स्तरावर फक्त उस्मानाबादचा उल्लेख धाराशीव असा होतो. जिल्ह्यात ग्रामीण भागात होणारा उल्लेख धाराशीव म्हणून केला जातो. महानगर पालिका निवडणूकीच्या तोंडावर औरंगाबादच्या नामांतराचा विषय असताना शिवसेनेकडून आता उस्मानाबादच्या नामांतरासाठी शिवसेना आग्रही भूमिका घेताना दिसते आहे.

‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER