‘राफा’ म्हणतो, टेनिस माझी आवडच नाही तर माझे कामसुध्दा आहे

Rafael Nadal.jpg

स्पॕनिश टेनिसपटू (Spain Tennis) राफेल नदालने (Rafael Nadal) आणखी एक मैलाचा दगड पार केला. एक हजार विजयांचा टप्पा त्याने पार केला.हा टप्पा गाठणारा तो चौथाच खेळाडू. यापैकी एक म्हणजे त्याचा प्रतिस्पर्धी तेवढाच चांगला मित्र स्वीत्झर्लंडचा राॕजर फेडरर (Roger Federer) . ‘फेडाल’ म्हणून त्यांची जोडी प्रसिध्द आहे.

‘राफा’च्या या हजार विजयांच्या टप्प्याबद्दल राॕजर फेडररने म्हटलेय की, एक व्यक्ती आणि एक चॕम्पियन म्हणून राफाबद्दल मला अतीव आदर आहे. गेल्या बऱ्याच वर्षांपासून तो माझा निकटचा प्रतिस्पर्धी आहे. मला वाटते की आम्ही दोघांनी एकमेकांशी स्पर्धा करुन आमचा खेळ उंचावला आहे.

स्वतः राफा’ने आपल्या खेळाच्या मनोधारणेबद्दल आपल्या आत्मचरित्रात म्हटलेय की, टेनिस ही माझी आवड आहे. पण त्यासोबतच ते माझे काम आहे असे मी मानतो. ते काम प्रामाणिकपणे करायचा माझा प्रयत्न असतो. माझ्या वडिलांचा काचेचा व्यवसाय किंवा आजोबांचा फर्नीचरचा व्यवसाय सांभाळण्यासारखेच हे आहे.

नोव्हाक जोकोवीचने म्हटलेय की, आमच्या दोघांतील काही सामने माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरले आहेत. त्या सामन्यांनी मला माझ्या खेळाबद्दल विचार करण्यास भाग पाडले आहे. त्याच्यासोबतच्या स्पर्धेनेच मला मी आज जो खेळाडू आहे ते बनवलेय यात शंका नाही.

ग्रीक टेनिसपटू स्टेफानोस सिसीपास म्हणतो की त्याची जिंकायची भूक व लढण्याची वृत्ती, त्याचा खेळायचा वेग आणि मैदानावरची त्याची चपळता मला आश्चर्यचकित करते.

कार्लोस मोयाने म्हटलेय की जेंव्हा त्याने मला पहिल्यांदा हरवले होते तेंव्हा तो खूपच लाजरा व नर्व्हस होता. मला हरवल्याबद्दल त्याला वाईटही वाटत होते. मला तेंव्हाच अंदाज आला होता की, पूढे बऱ्याचदा तो मला हरवले. त्यावेळी त्याने ज्या काही अपेक्षा दाखवल्या होत्या त्या पूर्ण केल्या होत्या.

आंद्रे अगासीने म्हटलेय की, नदाल हा एका बाॕक्सरसारखा आहे. तो सारखे ठोसे लगावताच राहतो आणि प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER