जोकोवीचचे मन जिंकणाऱ्या कॕमेरुन कीडसचा हा व्हिडीओ पाहिलाय का?

Maharashtra Today

टेनिसचा (Tennis) खेळ लोकांना किती आवडतो आणि या खेळावर लोकांचे किती प्रेम आहे याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे आणि जगातील नंबर वन टेनिसपटू नोव्हाक जोकोवीचने (Novak Djokovic) त्याची दखल घेतली आहे आणि या टेनिसवेड्या मुलांचे कौतुक केले आहे.

मध्य आफ्रिकेतील कॕमेरुन(Cameroon) देशातील हा व्हिडीओ आहे. टेनिस ओयबाॕग अॕकेडमीचा (Tennis oyebog academy) हा व्हिडिओ आहे.

त्यात एका इमारतीमागच्या छोट्याशा जागेत टेनिस अॕकेडमी सुरु आहे आणि तिथे प्रशिक्षक तिकडच्या लहानग्या व युवा खेळाडूंना प्रशिक्षण देत आहेत. प्रत्येकाला फक्त दोनच फटके मारायला मिळताहेत पण त्यासाठी लांबलचक लाईन, अगदी रस्त्यावरसुध्दा लाईन लागली आहे आणि त्या रांगेतील प्रत्येक मुलाच्या हातात रॕकेट आहे. ती हाती घेऊन ते आनंदाने नाचत आहेत, गात आहेत आणि आपला नंबर येण्याची वाट पाहात आहेत. ज्याचा नंबर लागला तो उत्साहाने ते दोन फटके मारतोय आणि लगेच बाजूला होता आनंदाने दुसऱ्याला संधी देतोय आणि परततानासुध्दा नाचत, गातच ते परतत आहेत. कुणालाही आनंद देणारा, त्यासोबतच टेनिसवर लोकांचे किती प्रेम आहे हे दाखवणारा तो व्हिडिओ आहे.

हा व्हिडीओ बघून चक्क नंबर वन जोकोवीचने व्टिट केले आहे. आपल्या व्टिटमध्ये त्याने म्हटलेय, “टेनिसवरील प्रेम आणि टेनिसचे वेड दाखवणारा हा व्हिडीओ आहे. मला तो अतिशय आवडला. ज्या प्रशिक्षकांनी हे केलंय त्यांचे मी आभार मानतो. किती कल्पकता आहे. फारच छान! ता. क.- आणि हो…चेंडू फटकावण्याची संधी मिळायची वाट पाहताना ज्या पध्दतीने ते गाताहेत आणि उड्या मारताहेत ते बघून मजा आली.

जोकोवीच सारखा खेळाडू कौतुक करतोय म्हटल्यावर प्रतिक्रियासुध्दा आल्या आहेत. त्यात एकाने जोकोवीचला माहिती देताना म्हटलेय की, यस लिजेंड, हे कॕमेरुन आहे. आमच्या देशात खेळांच्या प्रती लोक वेडे आहेत.सोयीसुविधा नसल्या तरी खेळांवर प्रेम करणे ही आमची परंपराच आहे. या कॕमेरुन कीडसचे तू कौतुक करतोय हे बघून आनंद झाला. तुझ्यासारखा चॕम्पियन खेळाडू नेहमीच जे दिसते त्याच्या पलीकडे बघत असतो”. या टेनिसओयबॉग अकॕडेमीला व अशाच इतर धडपडणाऱ्या संस्थाना त्याने व इतर आघाडीच्या टेनिसपटूंनी मदत करावी असे आवाहनही लोकांनी जोकोवीचला केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER