सचिनचे चाहत्यांना आवाहन : प्लाज्मादान करा, रक्तदान करा!

Sachin Tendulkar - Maharastra Today

वाढदिवसानिमित्त शुभेच्छांच्या वर्षावात न्हाऊन निघालेला महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने शुभेच्छांसाठी सर्वांना धान्यवाद दिले आहेत आणि कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी आपल्या चाहत्यांना रक्तदान करण्याचे व प्लाज्मा दान करण्याचेही आवाहन केले आहे. तो स्वतःसुद्धा प्लाज्मा दान (Plasma Donation) करणार आहे. आपल्या चाहत्यांना धन्यवाद देण्यासाठी सोशल मीडियावर (Social Media) जारी केलेल्या एका विशेष व्हिडीओ संदेशात सचिनने सर्वांना हे आवाहन केले आहे. वाढदिवसानिमित्त शनिवारी सचिनवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला.

त्या शुभेच्छा स्वीकारतानाच चाहत्यांना धन्यवाद देताना सचिनने म्हटलेय की, गेले काही दिवस परीक्षेचे होते. आपल्याला कोरोना झाला. त्यामुळे २१ दिवस क्वारंटाईन व्हावे लागले; परंतु आपल्या सर्वांच्या सदिच्छा, कुटुंबीयांचे प्रेम आणि आपल्यावर उपचार करणारे डॉक्टर व त्यांचे सहकारी यांनी घेतलेली मेहनत व दिलेला विश्वास यामुळे आपण त्या संकटातून बाहेर आलो. यासाठी खूप खूप धन्यवाद; पण आता कोरोनाने खूप लोकांचे हाल होत आहेत. त्यासाठी डॉक्टरांनी प्लाज्मा व रक्त दान करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार मी प्लाज्मा दान करणार आहे आणि तुम्हालाही ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या सर्वांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने प्लाज्मा व रक्त दान करावे, असे आवाहन मास्टर ब्लास्टरने केले आहे. सचिनने गेल्या वर्षीच प्लाज्मा डोनेशन सेंटर सुरू केले होते.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar)


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button