अँडरसनच्या रिव्हर्स स्विंग कौशल्याचे सचिनकडून कौतुक

James Anderson-Sachin Tendulkar

फिरकी गोलंदाजांचे कौशल्य चेंडू वळविण्यावर असते तर जलद गोलंदाजांचे स्विंग करण्यावर. चेंडू स्विंग करताना इनस्विंग, आऊटस्विंग आणि रिव्हर्स स्विंग असे प्रकार साधारणपणे बघायला मिळतात; पण इंग्लंडचा जलद गोलंदाज जेम्स अँडरसन याने चौथा आणि अनोखा प्रकार आत्मसात केला आहे- तो म्हणजे ‘रिव्हर्स’ स्विंग आणि त्याच्या या कौशल्याचे कौतुक होत आहे.

अँडरसनचे कौतुक करण्यामध्ये सचिन तेंडुलकरसारखा सर्वांत यशस्वी फलंदाजसुद्धा आहे. सचिनने १४ कसोटी सामन्यांमध्ये अँडरसनचा सामना केला आहे आणि तो नऊ वेळा त्याला बळी पडला आहे.

अँडरसनचे कौशल्य हे आहे की, आऊटस्विंगर टाकताना आपल्या मनगटाच्या हालचालीेंनी तो फलंदाजांना बुचकळ्यात टाकतो. या आऊटस्विंगरला तो रिव्हर्स स्विंगची जोड देतो. सहसा चेंडू त्याच्या घासल्या गेलेल्या बाजूकडे स्विंग होतो; मात्र रिव्हर्स स्विंग होणारा चेंडू चमकत्या बाजूकडे स्विंग होतो. म्हणजे पारंपरिक इनस्विंगरसाठी चेंडूचा कल हा रिव्हर्स आऊटस्विंगरसारखाच असतो. यासाठी मनगटाची स्थिती वेगवेगळी असते; पण ब्रायन लारासोबत बातचित करताना सचिन तेंडुलकर म्हणाला की, पारंपरिक इनस्विंगरच्या पद्धतीनेच मनगटाची स्थिती ठेवून अँडरसन रिव्हर्स आऊटस्विंगर करू शकतो.

ही बातमी पण वाचा : रॉस टेलरने जगातील तीन सर्वात वेगवान गोलंदाजांची निवड केली, एक आहे…

सचिनच्या म्हणण्यानुसार रिव्हर्स स्विंगसुद्धा रिव्हर्स पद्धतीने करू शकणारा जिमी अँडरसन हा कदाचित पहिलाच गोलंदाज असावा. एवढ्या वर्षात मी जे काही अनुभवले त्यानुसार तो चेंडू असा पकडतो की जणू काही आऊटस्विंगर टाकणार; पण चेंडू सोडताना तो अशी काही करामत करतो की चेंडू आतमध्ये येतो. चेंडू इनस्विंग करताना चेंडूच्या दोन्ही बाजूंमधील पृष्ठभागाचा फरक चेंडूला बाहेर काढतो. यात होते काय की, तुम्ही इनस्विंगर खेळायच्या तयारीत असता आणि चेंडू मात्र बाहेर निघत असतो. असे इतर कुणीच करू शकत नाही. स्टुअर्ट ब्रॉडने तसा प्रयत्न सुरू केला आहे; पण अँडरसनने फार पूर्वीच हे केले आहे म्हणून मी त्याला रिव्हर्स स्विंगचा अतिशय खुबीने प्रभावी वापर करणारा गोलंदाज मानतो.

अशाच रिव्हर्स स्विंगच्या जोरावर २०१२ च्या कोलकाता कसोटीत त्याने दोन्ही डावांत तीन विकेट घेत इंग्लंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यात सचिन तेंडुलकरचीही विकेट होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER