IPL 2020: सचिनने केले आयसीसीकडे अपील, फलंदाजांसाठी हेल्मेट घालणे असले पाहिजे अनिवार्य

Sachin Tendulkar

भारताचा माजी सलामीवीर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) आयसीसी (International Cricket Council) कडे फलंदाजांसाठी हेल्मेट अनिवार्य करण्याची मागणी केली आहे. सचिनने आपल्या ट्विटर हँडलवर आयपीएल सामन्याचा व्हिडिओ सामायिक केला आहे, त्यात विजय शंकर निकोलस पूरणच्या थ्रोमुळे जखमी झाला होता आणि तो जखमी होऊन मैदानात पडला होता. व्हिडिओ सामायिक करताना सचिन म्हणाला की अशी घटना अत्यंत धोकादायक असू शकते.

आपल्या ट्विटरवर व्हिडिओ सामायिक करताना सचिनने लिहिले की, ‘खेळ वेगवान होत आहे, पण तो सुरक्षितही आहे का? अलीकडे आम्ही एक घटना पाहिली जी धोकादायक असू शकते. वेगवान गोलंदाजाला खेळत आहेत किंवा फिरकी गोलंदाजाला खेळात आहेत फलंदाजांनी हेल्मेट घालावे. आयसीसीला हे प्राधान्य देण्याची विनंती आहे. सचिनच्या ट्विटनंतर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातही असेच एक दृष्य पाहायला मिळाले होते, जेव्हा फील्डरचा थ्रो शरद मुंबईचा फलंदाज धवल कुलकर्णीच्या हेल्मेटला लागला. मात्र, या थ्रो ने धवलला दुखापत झाली नाही. सचिननेही हा व्हिडिओ आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे.

विशेष म्हणजे नोव्हेंबर २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये घरगुती सामन्यादरम्यान फलंदाज फिलीप ह्यूजच्या गळ्याला बाउन्सर लागल्यामुळे मृत्यू झाला होता आणि खेळाडूंच्या सुरक्षेबाबत वादविवाद झाला होता, त्यानंतर हेल्मेटच्या गुणवत्तेवर बरेच काम केले गेले होते.

ही बातमी पण वाचा : IPL 2020: मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांनी सांगितले- कोणता कालावधी दिल्ली कॅपिटल्ससाठी राहिला सर्वात कठीण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक  पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER