नराधम पित्याला दहा वर्षे सश्रम कारावास

Rape-

ठाणे : पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पित्याला विशेष ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जी.पी.शिरसाट यांनी मंगळवारी दोषी ठरत,दहा वर्ष सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली. हा प्रकार 2015-16 च्या दरम्यान शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला होता. या खटल्यात सरकारी म्हणून वकील रेखा हिरवाळे यांनी काम पाहिले.

पिडीत मुलगी ही अकरा वर्षीय आहे. तर 45 वर्षीय आरोपी हा बिगारी कामगार आहे.घरात कोणी नसताना आरोपी हा पिडीत मुलीवर लैंगिक अत्याचार करत याबाबत कोणाला काही सांगितले.तर,तुङया आई आणि भावंडांना जीवे ठार मारण्याची धमकी अत्याचारी पिता पिडीत मुलीला देत होता.याबाबत पिडीत मुलीने झालेला प्रकार काही महिन्यांनी तिच्या आईला सांगितला. त्यानंतर, याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचारासह पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला.त्यावेळी दिलेल्या तक्रारीत, तिच्यावर 2015 नवरात्रोत्सवापासून अत्याचार करत असल्याचे म्हटले होते.

याप्रकरणी फरार नराधम पित्याला तब्बल दोन महिन्यांनी पोलिसांनी अटक केली. हा खटला विशेष ठाणो जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश शिरसाट यांच्या न्यायालयात आल्यावर सरकारी वकील रेखा हिरवाळे यांनी सादर केलेले पुरावे,युक्तीवाद आणि साक्षीदारांची साक्ष ग्राह्यमानून अत्याचारी पित्याला दहा वर्ष सक्षम कारावास आणि पाच हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने शिक्षा भोगावी लागेल असे न्यायालयाने म्हटले आहे.