अनुकंपा भरतीसाठी १० हजार उमेदवार प्रतीक्षा यादीत : दत्तात्रेय भरणे

रेडा :- राज्यातील रिक्त पदे न भरल्यामुळे किंवा भरतीसाठी कमी उपलब्धतेमुळे अनुकंपा तत्त्वावर भरती हे बर्‍याच काळापासून प्रलंबित आहे. १० हजारांवर उमेदवार अनुकंपा तत्त्वावरील भरतीसाठी प्रतीक्षा यादीत आहेत. सरकार या सर्व उमेदवारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीत आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharne) यांनी दिली आहे.

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे म्हणाले की, अनुकंपा तत्त्वावरील भरतीसाठी पात्र उमेदवारांना न्याय देणे, हे राज्य सरकारचे धोरण आहे. या अनुषंगाने ही भरती जलदगतीने व्हावी. या अनुकंपाच्या प्रतीक्षा यादीतील सर्व उमेदवारांना टप्प्याटप्प्याने सामावून घेता यावे, यासाठी सर्वंकष प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत. या संदर्भात कोणालाही चिंता करण्याची गरज नाही, अशी ग्वाही दत्तात्रेय भरणे यांनी दिली.

यावेळी शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींनी विविध मागण्या मांडल्या. उमेदवार अनुकंपा तत्त्वावरील भरतीसाठी प्रतीक्षा यादीत आहेत. यांना तत्काळ सामावून घेण्यासाठी सन २००८ मध्ये राबवलेल्या कार्यपद्धतीनुसार आणखी निर्णय घेण्यात यावा. तसेच वयोमर्यादा उलटून गेलेल्या उमेदवारांऐवजी, अन्य वारसाला प्रतीक्षा यादीत घेण्यात यावे इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्या. याबाबत सरकार सकारात्मक विचार करेल. स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य तसेच प्रकल्पग्रस्तांना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत शासन सकारात्मक आहे, अशीही माहिती राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER