रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहातील १० जणांना कोरोनाची लागण

रत्नागिरी/प्रतिनिधी :- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सुरू झालेल्या लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी रत्नागिरी जिल्ह्याला जोरदार धक्का बसला. एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह ४६ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहातील १० जणांचा समावेश आहे.

काल रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालांनुसार रत्नागिरीतील एका उच्च प्रशासकीय अधिकाऱ्यासह एक डॉक्टर आणि जेलमधील १० जणांसह रत्नागिरी तालुक्यात १७ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. सर्वाधिक रुग्ण कारागृहामध्ये सापडले आहेत. एकाच वेळी कारागृहामधील १० जणांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. कारागृहामधील १० जणांमध्ये आठ  कैदी तर दोन कारागृह पोलिसांचा समावेश आहे. एकाच वेळी जेलमधील १० जणांना कोरोनाची लागण झाल्याने जेल प्रशासन हादरले आहे. याशिवाय आडिवरे येथील एकाला, रत्नागिरीच्या एका खासगी हॉस्पिटलमधील एक डॉक्टर, आरोग्य मंदिर येथील एक तर गणेशगुळे येथील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER