पुणे मुंबईसाठी दहा लाख लिटर दूध झाले पोहोच

Milk

मराठा आरक्षणाच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गोकुळ दूध संघातून मुंबई-पुण्याकडे जाणारे दूध रोखण्याचा इशारा दिला होता. यापार्श्वभूमीवर पुण्यात गोकुळचे जाणारे तीन लाख लिटर आणि मुंबईचे सात लाख लिटर दूध एक दिवस अगोदरच पाठविले होते. मुंबई-पुण्याला ५० टँकर दुधाचा पुरवठा अगोदरच झाल्याने दूधाची टंचाई जाणवणार नाही, तसेच गोकुळचेही नुकसान यानिमित्ताने टळले.

गोकुळ दूध संघाकडे रोज संकलित होणाऱ्या सरासरी १५ लाख लिटर दुधापैकी मुंबई आणि पुण्यासाठी १० लाख लिटर दुध पाठविले जाते. गोकुळ शिरगाव येथील प्रकल्पातून दिवस-रात्र दुधाचे टँकर ये-जा करत असतात. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दूध रोखण्याचा इशारा दिल्यानंतर गोकुळ प्रशानाने पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे संरक्षण पुरविण्याची मागणी केली होती. गुरूवारी सकाळी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गोकुळ संघाने बुधवारी दिवसभर आणि गुरूवारी पहाटेपर्यंत सुमारे दुधाचे ५० टँकर पुणे-मुंबईला रवाना केल्याने दुध पुरवठा सुरळीत पार पडला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER