सांगली जिल्ह्यात शुक्रवारपासून दहा दिवस जनता कर्फ्यू

Sangli

सांगली : सांगली जिल्ह्यात कोरोनाचा समूह संसर्गाच्या उद्रेक कमी व्हावा, संसर्ग साखळीत तुटाव यासाठी शुक्रवारपासून (ता. 11) दहा दिवस जनता कर्फ्यू जाहीर करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी दिली. अत्यावश्यक सेवा वगळता व्यापार, व्यवसायिकांनी बंद मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून लॉकडाऊन बाबत चर्चा होती. मात्र पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत लॉकडाउन नको, जनता कर्फ्यू पाळा, असे आवाहन केले होते. गेल्या दोन दिवसापासून लॉकडाऊन जाहिर करता येत नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे जनता कर्फ्यूचे पर्याय प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यापुढे होता. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे.

जिल्ह्यात 17 हजार कोरोना रुग्ण आणि मृत्यूची संख्या तब्बल सातशेवर पोहोचली आहे. दररोज मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 35 च्या घरात पोहोचली आहे. सांगलीसह जिल्ह्यातील काही व्यापारी संघटनांनी लॉकडाउन करण्याची मागणी केली होती. जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी त्या मागणीवर पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे सकारात्मक विचार बाबत शिफारस केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER