कागल तालुक्यामध्ये दहा दिवस जनता कर्फ्यु : हसन मुश्रीफ

Hassan Mushrif

कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी आज कागल तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी पदाधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे मीटिंग घेतली. त्यामध्ये कागल तालुक्यामध्ये रविवार ६ सप्टेंबर ते १५ सप्टेंबरअखेर दहा दिवस जनता कर्फ्यु पुकारला आहे. या काळात फक्त दूध, मेडिकल स्टोअर्स, शेती सेवा केंद्र, सरकारी निमसरकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना ओळखपत्र दाखवून जाता येईल, बँका बंद राहतील,ATM सुरू राहील, विनाकारण विना मास्क फिरणाऱ्या लोकांवर पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी सक्त सूचना मंत्री मुश्रीफ यांनी दिली. कडकडीत बंद पाळून कोरोना हद्दपार करूया तरी सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मुश्रीफ यांनी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER