कागलनंतर आता गडहिंग्लजमध्ये दहा दिवसांचा जनता कर्फ्यू : हसन मुश्रीफ

कोल्हापूर :  ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या कागल-गडहिंग्लज (Kagal) या विधानसभा मतदार संघात कोरोना (Corona) महामारी रोखण्यासाठी जनता कर्फ्यू (Janta Curfew) करण्याची तयारी सुरू केली आहे. काल हसन मुश्रीफ यांनी कागलसाठी जनता कर्फ्यू जाहीर केला. आता त्यांच्याच मतदार संघाचा भाग असलेल्या गडहिंग्लज येथे ही १० दिवसांचा जनता कर्फ्यू करण्याचे ठरले.

शहरासह तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज तालुका लॉकडाऊन करण्याबाबत गेल्या दोन दिवसांपासून चर्चा सुरु होत्या. पंचायत समितीच्या सभागृहात तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलाविली होती. या बैठकीत संपूर्ण तालुक्यामध्ये सोमवार दि. ७ ते १६ सप्टेंबरअखेर दहा दिवसांचा कडक जनता कफ्फ्यू करण्याबाबत एकमत झाले. यानुसार प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलिस प्रशासन यांना निवेदन देऊन कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याबाबत विनंती करण्यात आली. यानंतर पालिकेच्या शाहू सभागृहात गडहिंग्लज शहरातील व्यापाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीतही संपूर्ण शहर दहा दिवसांसाठी लॉकडाऊन करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER