मंदिरे सुरु : भाजपाकडून आनंदोत्सव

Anandotsav from BJP

कोल्हापूर : कोरोनामुळे राज्यातील मंदिरे, प्रार्थनास्थळे गेली ८ महिने बंद ठेवण्यात आली होती. आता कोरोनाची साथ आटोक्यात आल्यावर मंदिरे, प्रार्थनास्थळे कधी उघडणार याकडे भाविकांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर राज्य सरकारने आजपासून महाराष्ट्रातील मंदिरे, प्रार्थनास्थळे सुरु करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाबद्दल भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांचे नेतृत्वाखाली महाद्वार चौक येथे ढोल ताशांचा गजरात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी अंबा माता की जय, उद ग आई उद, जोतीबाच्या नावांन चांगभल, गणपती बाप्पा मोरया अशा घोषणा दिल्या.

याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, गेली ८ महिने महाराष्ट्रातील ही मंदिरे बंद होतीत. ही मंदिरे उघडावीत म्हणून भारतीय जनता पार्टीच्यावतीने वारंवार अनेक आंदोलने केली. राज्यात एकीकडे दारूची दुकाने सुरु झाली, मॉल उघडलले, बार उघडले पण सर्व धर्मांची श्रद्धास्थाने असलेली मंदिरे, प्रार्थनास्थळे यापूर्वीच सुरु करायला पाहिजे होती कारण त्याठिकाणी सोशल डीस्टनसिंगचे भान पाळण्याची शक्यता जास्त होती. पण उद्धव ठाकरे सरकारनी फक्त भारतीय जनता पार्टी मंदिरे उघडा म्हणत आहे म्हणून मंदिरे उघडली नाहीत असे आमचे मत आहे.

या सरकारला मंदिरांच्या बाबतीत एवढी उदासीनता का हा येणारा काळ ठरवेल. आज वेळानं का होईना मंदिरे सुरु झाली त्यामुळे आई अंबाबाई या सरकारला जनतेची काम करण्याची सुबुद्धी द्यावी अशी प्रार्थना केली. मद्यालये लवकर उघडली पण मंदिरे उघडली नाही हे सरकारचे अपयश म्हणावे लागेल. तरीसुद्धा आम्ही आज मंदिरे उघडल्याचा आनंदोत्सव साजरा करत असल्याचे सांगितले. तसेच चांगल्या विचारांचे, कामाचे भारतीय जनता पार्टीचे सरकार महाराष्ट्रात पुन्हा सत्तेत यावे अशी प्रार्थना उपस्थित सर्वांच्या वतीने देवीकडे करण्यात आली.

याप्रसंगी भाजपा प्रदेश ओ.बी.सी.मोर्चा अध्यक्ष योगेश टिळेकर, सरचिटणीस दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, उपाध्यक्ष मारुती भागोजी, राजू मोरे, अमोल पालोजी, विजय आगरवाल यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER