मंदिर बंद, उघडले बार ; उद्धवा धुंद तुझे सरकार!

Acharya-Tushar-Bhosale-on-uddhav-

मुंबई : भाजपच्या (BJP) आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले (Acharya Tushar Bhosale) यांनी ठाकरे सरकारने (Thackeray Government) मंदिराऐवजी मदिरालय  सुरू केले असून संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात मंदिर बंद, बार सुरू असे काळे चित्र निर्माण केले असून १३ ऑक्टोबरला विविध संप्रदायांतील साधू-संत व आध्यात्मिक संघटनांना सोबत घेऊन लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे सांगितले आहे.

गेले सहा  महिने कोरोनाने (Corona) राज्यासह देशातदेखील थैमान घातले आहे. कोरोना महामारीला प्रतिबंध घालण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला होता. तर, जून महिन्यापासून अनलॉक प्रक्रिया सुरू  केल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येत आहे. आता अनलॉक- ५ लागू करण्यात आला असून रेस्टोरंट, बारदेखील सुरू करण्यात आले आहेत.

येत्या काही दिवसांत सिनेमागृहेदेखील सुरू करण्यात येतील; मात्र राज्य सरकारने मंदिरे खुली करण्याबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. नवरात्रोत्सवदेखील तोंडावर आला असून राज्यातील साडेतीन शक्तिपीठांचे लाखो भाविक भक्त दर्शन घेत असतात.  त्यामुळे होणाऱ्या उलाढालीवर तीर्थक्षेत्रातील व्यापारी व इतर घटकांनादेखील रोजगार उपलब्ध होत असतो. यंदा मात्र कोरोनाचे संकट या उत्सवावर कायम असून व्यापाऱ्यांचा रोष आता वाढत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER