सत्य सांगितल्याने काहींची अडचण होत असेल … : आशिष शेलार

- वयासोबत परिपक्वता वाढावी, संजय राऊतांना खोचक शुभेच्छा

Sanjay Raut And Ashish Shelar

शिवसेनेचे संजय राऊत रोज करत असलेल्या बेफाम वक्तव्यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी राऊत यांना वाढदिवसानिमित्त – वयासोबत परिपक्वता वाढावी, आशी खोचक शुभेच्छा दिली आहे.


मुंबई : शिवसेनेचे संजय राऊत रोज करत असलेल्या बेफाम वक्तव्यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी राऊत यांना वाढदिवसानिमित्त – वयासोबत परिपक्वता वाढावी, आशी खोचक शुभेच्छा दिली आहे.

उद्धव ठाकरे आणि मोदींमध्ये विसंवाद निर्माण करण्यासाठी संजय राऊतच जबाबदार असल्याचा आरोप शेलार यांनी केला व मंदिराची शपथ घेऊन असत्य पसरवणं मान्य नाही असा टोमणा मारला. शिवसेनेचा मोदींबद्दलचा आदर स्वरार्थी की नि:स्वार्थी असा प्रश्नही विचारला.

अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा उल्लेख करत आशिष शेलार म्हणाले की, अमित शाह यांनी कोणाला खोटं पाडण्यासाठी नाही तर सत्य समोर आणण्याचं काम केलं आहे. अमित शाह यांनी मांडलेली भूमिका सत्य आहे. सत्य सांगितल्यावर काहींची अडचण होत असेल तर आम्ही काही करु शकत नाही. राजकीय स्वार्थापोटी असत्य पसरवणं मान्य नाही.

सत्तास्थापनेच्या तीन अंकी नाटकावर भाजपचं लक्ष – शेलार

संजय राऊत यांनी भाजपाचे अध्यक्ष अमित शाह हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवसेनेपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. मोदींचे बाळासाहेबांबरोबर खास नातं होतं. हे नातं ते पंतप्रधान होण्याआधीपासूनचं होतं. आता कोणीतरी मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये फूट पाडू पाहत आहे असा आरोप राऊत यांनी केला होता. यावर बोलताना आशिष शेलार यांनी विसंवाद निर्माण करण्याचं काम कोण करतं हे संपूर्ण महाराष्ट्र रोज सकाळी दूरचित्रवाणीवरुन पाहतो, असा संजय राऊत यांना टोमणा मारला.

तिन्ही पक्षांचं सुरु असलेलं नाटक महाराष्ट्राला अमान्य आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये एकमेकांना भेटण्यासाठी ओढ लागली आहे. मातोश्रीऐवजी पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठका सुरु आहेत, असे सांगून आशिष शेलार म्हणाले – मातोश्रीचा सन्मान ठेवून भाजपा नेते मातोश्रीवर राजकीय चर्चा करण्यासाठी जात असायचे. पण आता सत्तेच्या लालसेपोटी मातोश्री सोडून पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटायला जात आहेत. मातोश्रीवरुन कोणी राज ठाकरेंनाही भेटायला जात नव्हतं. पण आता मातोश्री सोडून माणिकराव ठाकरे यांना भेटायला जात आहेत!