राज्यपालांना आमदारांची यादी मंजूर करायला सांगा; सभागृहात मुनगंटीवार-परब भिडले

Sudhir Mungantiwar & Governor & Anil Parab

मुंबई : यंदाचे हिवाळी अधिवेशन दोनच दिवसांचे आयोजित केले आहे. सभागृहात विरोधक व सत्ताधा-यांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळत आहे. यावेळी लोकशाहीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोपच भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केला.

तर लोकशाहीवर बोलण्याआधी राज्यपालांना १२ आमदारांची यादी मंजूर करायला सांगा, असा पलटवार परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी केला. अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी जनतेचे  प्रश्न सोडवण्यासाठी आमदारांच्या अध्यक्षतेखाली समित्या तयार करण्यात येतात. मात्र, या समित्यावर समिती प्रमुखाची आणि सदस्यांची नियुक्ती केली. पण त्याची यादीही देण्यात आली नाही. याबाबतच्या बैठकी  घेतल्या पाहिजे; पण असं होत नसल्यामुळे महाविकास आघाडी सरकारकडून लोकशाहीला बेशुद्ध करण्याचे काम सुरू आहे, असा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी केला.

मुनगंटीवार यांच्या आरोपाला उत्तर देत शिवसेनेचे नेते आणि परिवहनमंत्री अनिल परब यांनी, आम्ही बैठकीचे आयोजन करतो. तुम्ही राज्यपालांना १२ आमदारांच्या यादीचा निर्णय घेण्यास सांगा, असा टोला लगावला. सभागृहातच दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी पाहण्यास मिळाली. अखेर विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांनी हा मुद्दा सभागृहाबाहेरचा असल्याचं सांगून वादावर पडदा टाकला. लोकमत न्यूज-१८च्या सौजन्याने.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER