काम कसे करायचे हे घरबशा मुख्यमंत्र्यांना सांगा, भातखळकरकरांचा संजय राऊतांना टोमणा

Atul Bhatkhalkar - Sanjay Raut

मुंबई :- भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत १० बालकांचा मृत्यू झाल्यानंतर शिवसेनेचे (Shivsena) मुखपत्र सामनामधून केंद्रावर टीका करण्यात आली! राजकारण कमी करुन पंडित नेहरुंच्या काळात आरोग्य व्यवस्थेवर जसे काम झाले तसे काम करण्याचा सल्ला दिला. यावर

भाजपाचे नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी संजय राऊतांना (Sanjay Raut) टोमणा मारला – काम कसे करायचे हे घरबशा मुख्यमंत्र्यांना सांगा.

ही बातमी पण वाचा : ‘…तर ईडीच्या कार्यालयासमोर त्यांना जोड्याने मारलं नाही तर माझं नाव संजय राऊत नाही’

सामानाने म्हटले आहे – दहा बालकांच्या मृत्यूचे खापर यांच्यावर किंवा त्यांच्यावर फोडत बसण्यापेक्षा या दुर्घटनेचे आत्मचिंतन करून संपूर्ण आरोग्य व्यवस्थेस नवसंजीवनी देता येईल काय, याचा विचार व्हायला हवा. चिमुकल्यांची होरपळ आणि कुपोषणाची पानगळ महाराष्ट्राला लागलेला डाग आहे. केंद्र सरकारने या घटनेबाबत दुःख व्यक्त केले. दुःख व्यक्त करून काय होणार? थोडे राजकारण कमी करा आणि पंडित नेहरूंच्या काळात आरोग्य व्यवस्थेवर जसे काम झाले तसे करा.

याच मुद्द्यावरून अतुल भातखळकर यांनी शिवसेनेचा ट्वीटमधून चांगलाच समाचार आपल्या घेतला. काम कसे करायचे हे घरबशा मुख्यमंत्र्यांना सांगा. सल्ल्याची गरज त्यांना जास्त आहे. पण तेही बोरूबहद्दरांच्या मताला फार किंमत देत नसावेत…असा खोचक टोमणा भातखळकर यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मारला.

नेहरूंनी केलेली कामे (की कांड) निस्तारण्यासाठीच जनतेने मोदींना दुसऱ्यांदा प्रचंड समर्थन देऊन पंतप्रधान बनवले. संजय राऊतांसारख्या बोरूबहद्दरांच्या मतांना मोदी किमंत देत नाहीत हे देशाचे भाग्य, भातखळकर म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER