सावरकरांना भारतरत्न द्यावा की नाही हे आधी सांगा

- अनिल परब यांचा भाजपाला सवाल

Anil Parab

मुंबई : सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपाने त्यांच्या गौरव प्रस्तावासाठी आग्रह धरला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी – सत्ताधाऱ्यांनी सावरकरांचा गौरव प्रस्ताव मांडावा अशी मागणी लावून धरली. त्यासाठी विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घातला.

सावकरांचा गौरव प्रस्ताव नाकारल्यानंतर विरोधकांनी जोरदार घोषणा दिल्या. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “काँग्रेसचं मुखपत्र असलेल्या ‘शिदोरी’ या मासिकात सावरकरांना बलात्कारी, माफीवीर म्हटले आहे. त्या मासिकावर बंदी घाला. या मासिकातील तपशील वाचताना मला लाज वाटते. सावरकरांनी देशासाठी मोठं योगदान दिलंय. त्यांचा सन्मान झालाच पाहिजे”

सुधीर मुनगंटीवार यांनीही अध्यक्षांना प्रस्ताव देत सत्तापक्षाने दोन ओळींचा सावरकर गौरव प्रस्ताव मांडावा अशी मागणी केली. देशासाठी प्रचंड कष्ट झेलणाऱ्या स्वातंत्र्यवीरांच्या गौरवासाठी इतका संघर्ष करावा लागत असेल तर ते लाजीरवाणे आहे असे म्हणाले. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी यावरून शिवसेनेवर टीका केली.

आंध्रप्रदेशनंतर अधिवेशन संपण्यापुर्वीच महाराष्ट्रात ‘दिशा कायदा’ लागू होणार!

शिवसेनेकडून परिवहन मंत्री अनिल परब यांनी या हल्ल्याला उत्तर दिले. ते म्हणाले – “अध्यक्षमहोदय, भाजपाने जो प्रस्ताव मांडला आहे त्याची तपासणी करून योग्य निर्णय घेऊन सभागृहाचे कामकाज सुरु करा. नितेश राणे यांचेही मत या प्रस्तावाबाबत घ्या. त्यांना तसा प्रस्ताव मांडायला सांगा. आणखी पुढे सांगतो, सावरकरांना भारतरत्न द्यायचा की नाही त्याबाबतचा निर्णय आधी घ्या. त्यांना भारतरत्न जाहीर करा, त्यानंतर तुमच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आम्ही मांडतो; तुमचा आणि मोदी साहेबांचा अभिनंदनाचा प्रस्ताव मांडतो”, असं अनिल परब म्हणाले.

अजित पवारांची प्रतिक्रिया

या विषयावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले – “सावरकरांचं योगदान विसरुन चालणार नाही. त्यांच्या देशसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आम्हीही स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानतो. केंद्रात सत्ता असून त्यांना भारतरत्न का दिला नाही हे माहीत नाही. दोन वेळा देवेंद्र फडवणीस यांनी पत्र दिले आहे. पाच वर्ष त्यांचे सरकार होते, मात्र आजच गौरव प्रस्ताव का?