माझ्याव्यतिरिक्त कोणाचा फोन आला तर मला सांगा ; अजित पवारांनी पोलिसांसमोर भरला दम

Ajit Pawar

मुंबई :- पुणे (Pune) शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी चिंता व्यक्त केली आहे. शहरातील गुन्हेगारी बंद झाली पाहिजे. राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून आपल्याला सांगतो की, तो कुठल्या पक्षाचा, गटाचा याचा विचार न करता महाविकास आघाडीचं सरकार (Mahavikas Aghadi) असलं तरीदेखील गुन्हेगारीच्या निमित्तानं  चुकीचं वागत असेल तर त्याला कडक शासन करा. मी तुमच्यासोबत आहे.

अजिबात राजकीय हस्तक्षेप होऊ देत नाही. माझ्याव्यतिरिक्त कोणाचा फोन आला तर मला सांगा, मग मी त्या फोनवाल्या व्यक्तीकडे बघतो. माझी मतं आणि भूमिका स्पष्ट असते, असे अजित पवारांनी म्हटले. कोरोना (Corona) काळात केलेल्या कामामुळे पोलीस दलाची प्रतिमा उंचावली आहे. मात्र याच प्रतिमेला छेद देणारी दुर्दैवी घटना पुणे शहरात घडली.

चोरांना घाबरून रात्री गस्तीवर असलेले दोन पोलीस पळून गेले असल्याची घटना सीसीटीव्हीमधून उजेडात आली. चोर आले म्हणून पोलीसच पळतात ही केविलवाणी गोष्ट आहे. पोलिसांना बघून चोरांनी पळलं पाहिजे. उलट चोरांना बघून पोलीस पळतात हे असे करता कामा नये. त्या दोघांवर कारवाई केली. परंतु अशा  घटनांमुळे पोलिसांची प्रतिमा समाजात खराब होते, असेही अजित पवार म्हणाले.

ही बातमी पण वाचा : हेल्थ वॉचमुळे तुमचे ठिकाणही कळणार, अजित पवारांचे पोलिसांना चिमटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER