चिरफाड सोडा, खोटं बोल पण रेटून बोला’, हे महाविकास आघाडी सरकारचं धोरण – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट वाढले असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारने राज्याला कशी मदत केली, याची माहिती देण्यासाठी मंगळवारी पत्रकार परिषद घेत संपूर्ण आकडेवारीच जाहीर केली. त्यावर महाविकास आघाडीने आज संयुक्त पत्रकार परिषद घेत फडणवीस यांनी केलेला प्रत्येक आरोप फटाळून लावला. यावर परत फडणवीस यांनी फेसबुक लाईव्ह करत ‘चिरफाड तर सोडा, खोटं बोल पण रेटून बोला’, हे महाविकास आघाडी सरकारचं धोरण’ असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

‘खोटं बोल पण रेटून बोल हे महाविकास आघाडी सरकारचं धोरण आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. देशात सगळ्यात जास्त रुग्ण ज्या राज्यात आहेत त्या सरकारमधले मंत्री स्वतःची पाठ थोपटून धन्यता मानत आहेत. महाराष्ट्राच्या संपूर्ण जनेतला मित्र कोण आणि शत्रू कोण हे आता कळून चुकले आहे. सरकारला आम्ही मदतच करतो आहोत. मात्र सरकारच्या वतीने फेकाफेक केली जात असेल तर त्याचा पर्दाफाश आम्हाला करावाच लागेल असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER