मेवालालच्या राजीनाम्यानंतर तेजस्वीची नीतीश कुमारांवर टीका

- मी म्हटले होते ना, तुम्ही थकला आहात; तुमची विचारशक्ती क्षीण झाली आहे

Nitish Kumar - Tejashwi Yadav

पाटणा :- बिहारमध्ये नीतीश कुमार यांचे सरकार स्थापन झाल्याच्या तिसऱ्याच दिवशी (आज) शिक्षणमंत्री मेवालाल चौधरी (Mewalal Choudhary) यांनी राजीनामा दिला. त्यांच्यावर नियुक्त्यांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. राजदने यावरून आक्रमक होत नीतीश कुमार यांच्यावर बोचरी टीका केली. तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) म्हणाले – मी म्हटले होते ना, तुम्ही थकला आहात, तुमची विचारशक्ती क्षीण झाली आहे.

मुद्दाम भ्रष्टाचाऱ्यास मंत्री बनवले. टीका होत असतानाही पदभार दिला व तासाभरातच राजीनाम्याचं नाटक रचलं. खरे गुन्हेगार तुम्ही आहात, तुम्ही मंत्री का बनवलं? तुमचा दुटप्पीपणा व नाटक आता चालू दिलं जाणार नाही?”

दुसऱ्या ट्विटमध्ये ते म्हणाले – “मुख्यमंत्री महोदय, जनादेशाच्या माध्यमातून बिहारने आम्हाला एक आदेश दिला आहे की, तुमच्या भ्रष्ट नीती, हेतू व नियमांविरोधात तुम्हाला चेतावणी देत राहा. केवळ एका राजीनाम्याने होणार नाही, आता तर १९ लाख नोकऱ्या, करार आणि समान काम – समान वेतनासारखे अनेक सार्वजनिक मुद्यांवरून भेट होत राहील. जय बिहार, जय हिंद!”

लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav)
बिहारचे माजी मुख्यमंत्री व राजदचे सुप्रिमो लालू प्रसाद यादव यांनी याबाबत भाजपाला टोमणा मारला – ”दुर्देवं पहा, जे भाजपावाले कालपर्यंत मेवालालचा शोध घेत होते; आज मेवा मिळाताच त्यांनी मौन बाळगले आहे.”

तेजस्वी पहिल्याच कॅबिनेटमध्ये पहिल्या स्वाक्षरीनिशी १० लाख नोकऱ्या देण्यासाठी कटिबद्ध होते. नितीश यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये नियुक्तीत घोटाळा करणाऱ्या मेवालाल यांना मंत्री बनवून आपली प्राथमिकता दर्शवली आहे आहे. असा टोमणा लालू प्रसाद यादव यांनी मारला.

मेवलाल चौधरींनी दिले उत्तर
मंत्रीपदाचा राजीनामा देताना मेवालाल चौधरी यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांना उत्तर दिले. म्हणालेत – कोणताही खटला तेव्हा सिद्ध होतो, जेव्हा तुमच्या विरोधात आरोपपत्र दाखल झाले आहे किंवा न्यायालयाने काही निर्णय दिला आहे. माझ्या विरोधात आरोपपत्रही नाही आणि गुन्ह्याची नोंदही झालेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER