उद्धव ठाकरेंचे पुत्र तेजसची दमदार कामगिरी; चन्ना प्रजातीचा शोध

Tejas Thackeray

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे (Tejas Thackeray) आणि त्यांच्या टीमने मेघालय येथे महत्त्वपूर्ण संशोधन करत अत्यंत सुंदर आणि तितकाच दुर्मिळ असा ‘चन्ना स्नेकहेड’ (Channa Snakehead) हा मासा शोधला आहे. चन्ना स्नेकहेड या प्रजातीला ऑरिस्टॉन एम. रेंडॉन्गसंगी यांचं नाव देणार असल्याचं तेजस ठाकरे यांनी म्हटले आहे.

तेजस ठाकरे यांच्या या संशोधनाची दखल अमेरिकेतील ‘कोपिया- अमेरिकन सोसायटी ऑफ इचिथोलॉजिस्ट अॅण्ड हर्पेटोलॉजिस्ट ऑफिशियल जर्नल’ने (Copia – Official Journal of the American Society of Ichithologists and Herpetologists) घेतली आहे. या जर्नलमध्ये त्यांचे हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

तत्पूर्वी तेजस ठाकरे यांनी पश्चिम घाट, सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्येही संशोधन केले. आतापर्यंत 11 दुर्मिळ वन्य प्रजातींचा शोध लावला आहे. ज्यात खेकडा, पाली आणि इतर वन्यजीवनांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER