आदित्य नंतर तेजस ठाकरेही राजकारणात? आज पहिल्यांदाच राजकीय मंचावर दिसणार

Tejas Thackeray-Aditya Thackeray

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. आज राज्यात बड्या नेत्यांच्या सभेचा धुरळा उडणार आहे. धुळ्यात मुख्यमंत्री, संगमनेरमध्ये उद्धव ठाकरे तर अकोल्यात शरद पवारांची होणार आहेत. या सभांसाठी सर्वच पक्षांनी जय्यत तयारी केली असून या सभांमध्ये हे नेते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, यात विशेष म्हणजे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यानंतर त्यांचे धाकटे भाऊ तेजस ठाकरे हे पहिल्यांदाच राजकीय मंचावर दिसणार आहे.

ही बातमी पण वाचा:- माझ्या सैनिकामुळेच शिवसेना सत्तेत होती, आहे, आणि पुढेही राहणार – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे आज प्रचारासाठी अहमनदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेऊन करणार आहे. विशेष म्हणजे राजकारणापासून अलिप्त राहून सरपटणाऱ्या नवनवीन प्राण्यांचा शोध घेणारे तेजस ठाकरे हेही उद्धव ठाकरेंच्या सोबतीला असणार आहे. उद्धव ठाकरे आज अहमदनगर जिल्ह्यातून प्रचाराचा फोडत आहेत. त्यांची पहिली प्रचारसभा संगमनेरमध्ये होत आहे. आज दिवसभरात उद्धव ठाकरे अहमदनगर जिल्ह्यात चार सभा घेतील. उद्धव ठाकरे यांचा दुसरा मुलगा तेजस ठाकरे पहिल्यांदाच प्रचार सभेत दिसून येणार आहे. तर दुसरीकडे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे हे कोल्हापुरातील चंदगड, गागल भागात दौरा करणार आहेत.