कंगना उडवणार तेजस विमान

Kangana Ranaut

शांतच्या (Sushant Singh Rajput) मृत्युप्रकरणानंतर बॉलिवूडमध्ये नेपोटिझमची चर्चा सुरू करणाऱ्या कंगनाने  (Kangana Ranaut) आता तेजस विमान उडवण्याचा निर्णय घेतला आहे. आता तुम्ही म्हणाल कंगनाला भारतीय वायुदलाचे हे अत्याधुनिक फायटर विमान कोण उडवू देणार? तुम्ही काहीही सांगता. तुमचे अगदी बरोबर आहे. कंगना खरेखुरे तेजस विमान उडवणार नसून एका चित्रपटात या विमानाच्या पायलटची भूमिका ती साकारणार असून तिने स्वतःच सोशल मीडिया अकाउंटवर आपल्या या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.

यासोबतच एक पोस्टरही रिलीज केले असून कंगनाची ही पोस्ट प्रचंड व्हायरल झालेली आहे. पोस्टरमध्ये कंगना एअरफोर्स पायलटच्या लूकमध्ये दिसत असून बाजूलाच तेजस विमान दाखवले आहे. खरे तर फेब्रुवारीमध्येच कंगनाने या चित्रपटाबाबत माहिती दिली होती. परंतु लॉकडाऊनमुळे चित्रपटाचे काम थांबलेले होते. आता चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्यास सरकारने परवानगी दिल्याने अनेक चित्रपटांचे शूटिंग सुरू झाले आहे. तेजसचेही डिसेंबरपासून शूटिंग सुरू केले जाणार आहे. आपल्या पोस्टमध्ये कंगनाने ही माहिती दिली असून तेजस डिसेंबरमध्ये उडणार आहे. ‘या कथेचा मीसुद्धा एक भाग असल्याने मला याचा खूप अभिमान वाटत आहे. ही एका साहसी एअरफोर्स पायलटची कथा आहे. जय हिन्द!’ असे म्हटले आहे. कंगनाचे हे ट्विट हजारोंनी रिट्विट केले आहे.

हा अभिनेताही घेत होता ड्रग्ज, स्वतःच कबूल केले

सुशांत प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले असून ड्रग्ज आणि बॉलिवूडचे कनेक्शन समोर आले आहे. बॉलिवूडचे कलाकार ड्रग्ज घेतात हे उघड गुपित आहे. याची कबुली देणे कठीण असते. मात्र सैफ अलीने आपण २२ व्या वर्षी एमएसडी घेत असल्याची कबुली दिली आहे. सैफने एका मुलाखतीत सांगितले की, मला अंधाराची भीती वाटायची. ती  जाण्यासाठी मी एमएसडी घेण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर अंधाराची भीती माझ्या मनातून निघून गेली. त्यानंतर मात्र आपण ड्रग्जच्या वाट्याला गेलो नाही, असेही सैफने सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER