अर्थसंकल्पाच्या दिवशीच राज्यभरात तहसीलदार आणि उपजिल्हाधिकार्यालय बंद राहणार ?

मुंबई : तहसीलदार (tehsildar) नायब, तहसीलदार संघटनेने नायब तहसीलदार, तहसीलदार यांच्या विविध मागण्यांसंदर्भात शासनास दिनांक 25 जानेवारी रोजी निवेदन देऊन सदरच्या मागण्यांवर तात्काळ कार्यवाही करणेबाबत विनंती करण्यात आलेली होती .परंतु या मागण्यांवर शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने 8 मार्च पासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने या निवेदनाद्वारे यापूर्वीच दिलेला आहे . 8 मार्च पासून तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेचे सर्व सदस्य नायब तहसीलदार, तहसीलदार ,उपजिल्हाधिकारी हे बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याबाबत आपण शासनास पुरेसे अगोदर कळविले असूनही शासनाचा थंड प्रतिसाद बघून दिनांक 8 मार्च पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करायचा निश्चय संघटनेने केलेला आहे.

आज संघटनेच्या राज्यस्तरीय पदाधिकारी व सदस्यांची बैठक घेण्यात येऊन सर्वांचे मत विचारले असता, संघटनेतील जास्तीत जास्त सदस्यांचा 8 मार्च पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यास पाठिंबा असल्याचे निश्चित झालेले असल्याने संघटना आता आठ मार्च पासून बेमुदत आंदोलन करणार आहे.. या आंदोलनात सर्व सदस्यांनी सहभागी होणे बंधनकारक आहे ..या संदर्भातील अंतिम निर्णय उद्या दुपारपर्यंत संघटनेमार्फत कळविला जाईल, परंतु उद्या ,परवा व रविवार पर्यंत संघटनेच्या सदस्यांनी आपापल्या भागातील आमदार, खासदार व पालकमंत्री यांना भेटून आपल्या संघटनेची भूमिका स्पष्ट करायची आहे. या दृष्टीने प्रत्येक सदस्याने आपल्या आमदारांची भेट घेऊन आपल्या संघटनेची भूमिका आमदार महोदय मंत्रिमहोदयांना स्पष्ट करावी आणि संघटना जो आदेश देईल तो शिरसावंद्य मानून संघटनेची साथ तन-मन-धनाने द्यायची आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER