अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात टीम इंडियाचा सलग तिसरा विजय, केली एमएस धोनीच्या विक्रमाशी बरोबरी

Ajinkya Rahane

ऑस्ट्रेलिया विरुद्ध मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात टीम इंडियाला ८ गडी राखून विजय मिळाल्या सोबतच भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) एमएस धोनीच्या (MS Dhoni) विक्रमाची बरोबरी केली.

मेलबर्न (Melbourne) येथे खेळल्या गेलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाला ८ गडी राखून पराभूत केले आणि ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. नियमित कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेने टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

रहाणेने धोनीच्या विक्रमाची केली बरोबरी
या विजयामुळे अजिंक्य रहाणे ने माजी कर्णधार एमएस धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली. कर्णधार म्हणून पहिले तीन सामने जिंकणारा रहाणे दुसरा भारतीय खेळाडू ठरला. यापूर्वी एमएस धोनीने हे आश्चर्यकारक कामगिरी केली. कर्णधारपदी पहिल्या चार सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून देण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे.

रहाणेच्या नेतृत्वात टीम इंडियाचा विजय
मार्च २०१७ मध्ये प्रथमच अजिंक्य रहाणेने आपल्या नेतृत्वात भारतीय संघाला विजय मिळवून दिला. धर्मशाळेत खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा ८ गडी राखून पराभव केला. यानंतर रहाणेने बंगळुरुमध्ये सन २०१८ मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध खेळलेल्या कसोटीत भारतीय संघाला २६२ धावांनी विजय मिळवून दिला. रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाने आता ऑस्ट्रेलियाला मेलबर्नमध्ये 8 गडी राखून पराभूत केले आहे.

मेलबर्नमध्ये टीम इंडियाचा मोठा विजय
मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु भारतीय गोलंदाजांनी त्यांना १९५ धावांत गुंडाळले. यानंतर भारतीय क्रिकेट संघाने पहिल्या डावात ३२६ धावा केल्या आणि १३१ धावांची आघाडी घेतली. दुसर्‍या डावातही ऑस्ट्रेलियन संघ २०० धावा करण्यास सक्षम झाला आणि भारताला विजयासाठी ७० धावांचे लक्ष्य दिले, जे टीम इंडियाने २ गडी गमावून पूर्ण केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER