टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या नावावर आहे हे रेकॉर्ड्स

mohammed shami

भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या खास साहसांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्याने शमीला क्रिकेट विश्वात वेगळे बनवले.

सन सन २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मोहम्मद शमीने (mohammed shami) या दरम्यान क्रिकेट विश्वात अनेक विशेष विक्रम नोदवले आहेत. तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, क्रिकेट विश्वात शमीने केलेले काही अनोखे विक्रम.

एकदिवसीय क्रिकेट पदार्पणात सर्वाधिक मेडन ओवर

२०१२-१३ दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली होती. या मालिकेत टीम इंडियाचा आधीपासूनच ०-२ ने पराभव झाला होता. मालिकेच्या शेवटच्या सामन्यात मोहम्मद शमीने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. या सामन्यात शमीने आपल्या सर्वोत्कृष्ट आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाला १६७ धावांचा बचाव करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात मोहम्मद शमीने ९ षटकांत एक गडी बाद केला तर ४ मेडन ओवर टाकले. पदार्पणात कोणत्याही गोलंदाजाने एकदिवसीय सामन्यात इतके मेडन ओवर फेकलेले नाहीत.

कसोटी पदार्पणात पाच विकेट घेणारा सहावा भारतीय

२०१३ च्या उत्तरार्धात मोहम्मद शमीने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. कोलकाताच्या ईडन गार्डनमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पाच विकेट घेत शमीने आपल्या तुफानी गोलंदाजीने डेब्यू टेस्टला संस्मरणीय केले. पदार्पण कसोटीत मोहम्मद शमी पाच विकेट घेणारा सहावा भारतीय खेळाडू आहे.

एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक वन डे विकेट्स

गतवर्षी मोहम्मद शमीने पांढऱ्या आणि लाल चेंडूंनी तुफानी गोलंदाजी दाखविली. शमी जगातील सर्वांत भेदक असल्याचे सिद्ध झाले, विशेषत: वन डे स्वरूपात. हेच कारण होते, जे मोहम्मद शमीने सन २०१९ मध्ये एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक ४२ विकेट घेतल्या. यापूर्वी २०१४ मध्येही शमीने वन डेमध्ये ३८ बळी मिळवले होते.

विश्वचषकात हॅटट्रिक घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज

विश्वचषक क्रिकेटच्या इतिहासात असे ११ गोलंदाज झाले आहेत ज्यांनी या स्पर्धेदरम्यान हॅटट्रिक घेतली आहे. अशा परिस्थितीत मोहम्मद शमी हा विश्वचषकात हॅटट्रिक घेणारा भारताचा चेतन शर्मानंतरचा दुसरा गोलंदाज आहे. गेल्या विश्वचषकात शमीने अफगाणिस्तानविरुद्ध हा विक्रम केला होता.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वांत वेगवान १०० बळी घेणारा गोलंदाज

एकदिवसीय क्रिकेटमध्ये जर सर्वांत वेगवान १०० बळी घेण्याची चर्चा केली गेली तर मोहम्मद शमी हा एकमेव भारतीय गोलंदाज आहे ज्याने या स्वरूपात वेगवान विकेटचे शतक पूर्ण केले आहे. शमीने ५६ व्या एकदिवसीय सामन्यात हा पराक्रम पूर्ण केला. सन २०१९ मध्ये मोहम्मद शमीने न्यूझिलंडविरुद्ध हा पराक्रम केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER