इंग्लंडविरुद्ध टी -२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा- सूर्यकुमार, ईशान, तेवतिया यांना संधी

भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणार्‍या पाच टी -२० सामन्यांसाठी ( T20 series) टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. टी -२० मालिकेसाठी इशान किशन, सूर्यकुमार यादव आणि राहुल तेवतिया यांची भारताच्या १९ सदस्यीय संघात निवड झाली आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणार्‍या पाच टी -२० सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. कर्णधार विराट कोहली संघात परतला आहे. सर्व सामने अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर खेळले जातील. टी -२० मालिकेचा पहिला सामना १२ मार्च रोजी खेळला जाईल.

इंग्लंडविरुद्ध टीम इंडियामध्ये वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार परतला आहे. त्याचबरोबर सूर्यकुमार, राहुल तेवतियालाही संधी मिळाली आहे. ईशान किशनला ऋषभ पंतसह यष्टिरक्षक म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. शनिवारी विजय हजारे ट्रॉफीमध्ये इशान किशनने चमकदार खेळी केली होती, त्यानंतर त्याच्या निवडीबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या.

२२ वर्षीय इशानने मध्य प्रदेश विरुद्ध ९४ चेंडूत १७३ धावांची कर्णधार खेळी खेळली. त्याच्या IPL टीम मुंबई इंडियन्सनेही आपल्या ट्विटर हँडलवर आनंद व्यक्त केला. ईशान किशन IPL मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. तो IPL मध्ये गुजरात लायन्सकडूनही खेळला आहे.

इशानने IPL च्या ५१ सामन्यात १२११ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने सर्वाधिक ९९ धावा केल्या असून त्याने ७ अर्धशतकांची नोंद केली आहे. २०१६ च्या अंडर -१९ वर्ल्ड कपमध्ये तो भारतीय संघाचा कर्णधारही होता. तथापि, त्या वर्ल्ड कप फायनलमध्ये वेस्ट इंडीजकडून भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.

शेवटी सूर्यकुमारला मिळाली संधी

मुंबईसाठी घरगुती क्रिकेटमध्ये आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) सातत्याने मुंबई इंडियन्सकडून चांगली कामगिरी केल्यावर सूर्यकुमार यादवला अखेर संघात निवडले गेले. तसेच IPL मधील संस्मरणीय कामगिरीनंतर हरियाणाच्या तेवतियालाही संघात स्थान मिळविण्यात यश मिळवले. डावखुरा मनगट फिरकीपटू कुलदीप यादव आणि मनीष पांडे यांना संघातून वगळण्यात आले आहे, तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे.

भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्य कुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), ईशान किशन (यष्टिरक्षक), युजवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वाशिंगटन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर.

टी -२० आंतरराष्ट्रीय मालिका
पहिला टी २० आंतरराष्ट्रीय १२ मार्चः अहमदाबाद
दुसरा टी २० आंतरराष्ट्रीय १४ मार्च: अहमदाबाद
तिसरा टी -२० आंतरराष्ट्रीय १६ मार्च: अहमदाबाद
चौथा टी -२० आंतरराष्ट्रीय मार्च १८: अहमदाबाद
पाचवा टी २० आंतरराष्ट्रीय मार्च २०: अहमदाबाद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER