कसोटीसाठी टीम इंडिया सज्ज, ऑस्ट्रेलियाने आखली रणनीती

Kohli-vs-Paine

सिडनी : अडलेड ओव्हल येथे उद्या गुरूवारपासून भारत व ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका सुरू होत आहे. भारताने या मालिकेसाठी ‘टीम इंडिया’ सज्ज केली आहे. तर तिकडे ऑस्ट्रेलियानेही पाहुण्यांना पराजय करण्याची रणनीती आखली आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सहा गोलंदाज मैदानात उतरविणार आहे. एकूण चार सामन्यांच्या या मालिका राहणार आहे.

तिसरा कसोटी सामना भारताची ‘बॉक्सिंग डे टेस्ट’ असणार आहे. मेलबर्नला हा सामना होणार असून भारत ऑस्ट्रेलियामध्ये ‘बॉक्सिंग डे टेस्ट’ खेळण्याचा तसा दुर्मिळ प्रसंग आहे. भारताची तिसरी कसोटी २६ ते ३० डिसेंबर या कालावधीत मेलबर्नला होणार आहे. २६ डिसेंबर या दिवसाला भेटीचा बॉक्स घरच्यांना देण्याचा दिवस म्हणजे ‘बॉक्सिंग डे’ असे नाव पडले आहे. याच दिवशी भारताची तिसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये १९५०-५१ च्या अशेस मालिकेतील मेलबर्न कसोटी २२ ते २७ डिसेंबर या कालावधीत झाली, त्यावेळी बॉक्सिंग डे मधल्या दिवशी होता. त्यामुळे २६ डिसेंबरच्या आजुबाजुला कधीही सामना सुरू झाला तरी त्याला बॉक्सिंग डे टेस्टच म्हणायचे. १९७४-७५ मध्ये अशेस मालिकेत २६ डिसेंबर पासून तिसरी कसोटी खेळवण्यात आली आणि आधुनिक काळात ऑस्ट्रेलियामध्ये ‘बॉक्सिंग डे’च्या दिवशी कसोटी सुरू करण्याची प्रथा पडली. १९८० मध्ये तर मेलबर्नवर दरवर्षी २६ डिसेंबर, ‘बॉक्सिंग डे’च्या दिवशी कसोटीची सुरूवात करण्याचा करारच करण्यात आला.

भारताने क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादश सोबत सराव सामना खेळला. यातील काही उणीव भरून काढण्यासाठी भारताने चांगलाच अभ्यास केला आहे. यासाठी कर्णधार कोहली याने पाच गोलंदाज, एक अष्टपैलू तर पाच फलंदाज मैदानात उतरविणार आहे. मोहम्मद शमी, इशांत शर्मा, आर. अश्विन, उमेश यादव, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमरा यांना संधी आहे.

मोहम्मद शमी वेगवान गोलंदाजीबरोबर दोन्ही स्विंग शमी करू शकतो. तर आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी इशांत शर्मा प्रसिद्ध आहे. फिरकी गोलंदाजीबरोबर फलंदाजीमध्येही आर. अश्विनकडून संघाला मोठ्या अपेक्षा आहेत. ऑस्ट्रेलियातील उसळत्या खेळपट्टीचा फायदा घेण्यासाठी उमेश यादव सज्ज झाला आहे. पण पहिल्या कसोटीत त्याला संधी मिळालेली नाही.रवींद्र जडेजाला पहिल्या सामन्यात संधी मिळाली नसली तरी तो भारतासाठी ट्रम्पकार्ड ठरू शकतो. पण पहिल्या कसोटीत त्याला संधी मिळालेली नाही.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी १२ जणांचा भारतीय चमू मंगळवारी जाहीर करण्यात आला. अडलेड ओव्हल येथे गुरुवारपासून पहिल्या कसोटीला सुरुवात होत आहे. कर्णधार विराट कोहलीकडून या दौऱ्यात बऱ्याच अपेक्षा आहेत. त्याने येथे ८ कसोटीत ६२ च्या सरासरीने ९९२ धावा केल्या आहेत, त्यात ५ शतकं व २ अर्धशतकांचा समावेश आहे. उपकर्णधार अजिंक्य रहाणेला सराव सामन्यात सूर गवसला खरा, परंतु प्रत्यक्ष मालिकेत त्याची कामगिरी कशी होते याची उत्सुकता आहे. त्याने येथे ४ सामन्यांत ५७ च्या सरासरीने १ शतक व २ अर्धशतकांसह ३९९ धावा केल्या आहेत. लोकेश राहुलला आणखी एक संधी मिळणार की नाही, हे उद्याच कळेल. मात्र, येथे त्याने २ सामन्यांत ३२.५० च्या सरासरीने (१ शतक) १३० धावा केल्या आहेत.

सराव सामन्यात खणखणीत शतक झळकावणाऱ्या मुरली विजयला सातत्यपूर्ण खेळ करताना सलामीची धुरा सांभाळायची आहे. त्याने येथे ४ सामन्यांत ६०.२५ च्या सरासरीने ४८२ धावा केल्या आहेत. त्यात १ शतक व ४ अर्धशतकांचा समावेश आहे. मधल्या फळीतील भक्कम आधार असलेल्या चेतेश्वर पुजाराने येथे ३ सामन्यांत २०१ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर केवळ एक अर्धशतक आहे. रोहित शर्मा कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियात त्याची बॅट फार तळपली नाही. त्याने ३ सामन्यांत २८.८३ च्या सरासरीने (१ अर्धशतक) १७३ धावा केल्या आहेत.

हनुमा विहारी ऑस्ट्रेलियात प्रथमच खेळणार आहे. पण, रोहितला स्थान मिळाल्यास त्याला बाकावर बसूनच हा सामना पाहावा लागेल. आर अश्विन या एकमेव फिरकीपटूचा संघात समावेश करण्यात आलेला आहे. अश्विनने ६ सामन्यांत २१ विकेट घेतल्या आहेत. मोहम्मद शमीचा फॉर्म पाहता त्याच्याकडून अपेक्षा आहेत. येथे त्याने ३ सामन्यांत १५ विकेट घेतल्या आहेत. इशांत शर्माला ऑस्ट्रेलियात खेळण्याचा सर्वाधिक अनुभव आहे. त्याने येते १० सामन्यांत २० विकेट घेतल्या आहेत. जसप्रीत बुमरा प्रथमच ऑस्ट्रेलियात कसोटी सामना खेळणार आहे.