Video: टीम इंडियाच्या खेळाडूंनी रोहित शर्माचे केले जोरदार स्वागत, रवी शास्त्रीने दिली अशी प्रतिक्रिया

Rohit Sharma - Ravi Shastri

मेलबर्नमध्ये रोहित शर्मा (Ravi Shastri) भारतीय संघात सामील झाला आहे. रोहितच्या स्वागताचा व्हिडिओ BCCI ने सोशल मीडियावर (social media) शेअर केला आहे.

सलामीवीर रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७ जानेवारीपासून सिडनी येथे होणाऱ्या तिसर्‍या कसोटी सामन्याआधी बुधवारी भारतीय संघात सामील झाला. भारतीय संघाने बुधवारी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यात रोहित टीम हॉटेलमध्ये प्रवेश करतांना दिसत आहे आणि टीम कर्मचार्‍यांशी मीटिंग करताना दिसत आहे.

एडिलेडमधील पहिल्या कसोटी सामन्यात ३६ धावांवर बाद झाल्यानंतर भारतीय संघाने मेलबर्न येथे शानदार वापसी करत चार सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. आता रोहितच्या पुनरागमनमुळे संघ अधिक बळकट होईल. रोहित हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरल्यानंतर सिडनीमध्ये क्वारंटीन संपल्यानंतर मेलबर्नमध्ये संघात शामील झाला आहे.

BCCI ने व्हिडिओसह कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘पहा, मेलबर्नमध्ये टीम इंडियाशी कोण संबंधित होत आहे. संघात सामील झाल्याबद्दल रोहित शर्माचे स्वागत आहे.’

आपल्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला पाचव्यांदा IPL चॅम्पियन बनवणारा रोहित IPL दरम्यान जखमी झाला होता. तथापि, असे असूनही त्याने क्वालिफायर -१ आणि अंतिम सामना खेळला. यानंतर ते बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये गेले. कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी डिसेंबरच्या मध्यात रोहित ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाला आणि तो क्वारंटाईन मध्ये होता. त्या पूर्वी, संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीने मंगळवारी सांगितले होते की रोहित बुधवारी संघात सामील होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER