भारतीय संघाने भागिदारींचाही बनवला नवा ‘ओटीपी’

Team India created another OTP of Partnerships

अॕडिलेड (Adelaide) कसोटीत भारताच्या (India vs Australia) अवघ्या 36 धावात बाद होण्याने विरेंद्र सेहवागने (Virendra Sehwag) केलेल्या 49204084041 या ओटीपीची (OTP) चर्चा आहे. एकेरी धावात बाद झालेल्या सर्वच्या सर्व भारतीय फलंदाजांनी क्रमाने केलेल्या या धावा आहेत.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा सर्वच फलंदाज एकेरी धावात बाद झाले. यापूर्वी 1924 मध्ये असे घडले होते. त्यावेळी इंग्लंडच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या 30 धावात गुंडाळला होता. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेचा ओटीपी 70311420010 असा होता.

विरेंद्र सेहवागच्या व्टिटमुळे या ओटीपींची चर्चा असली तरी भारताच्या 36 धावात बाद होण्याने आणखी दोन ओटीपी तयार झाले आहेत. ते म्हणजे 1955 नंतर प्रथमच एखाद्या कसोटी डावात एकही भागिदारी दोन आकडी धावांची झाली नाही. 10 पेक्षा कमी धावांच्या अंतरात विकेट पडतच गेली.

1955 मध्ये इंग्लंडच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडला फक्त 26 धावात गुंडाळले होते. त्या डावातील भागिदारी होत्या अनुक्रमे 6 2 1 5 0 8 0 0 4 0 धावांच्या आणि आता अॕडिलेड कसोटीत भारतीय डावातील भागिदारी राहिल्या 7 8 0 0 0 4 7 0 5 5 धावांच्या. या प्रकारे भागिदारीचाही नवा ओटीपी भारतीय संघाने निर्माण केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER