टी-20 मध्ये टीम इंडिया व विराट ‘दि बेस्ट’

Team India and Virat Kohli

ऑस्ट्रेलियातील (Australia) टी-20 (T 20 cricket) मालिका पहिल्या दोन सामन्यांतच जिंकून भारतीय (India) संघाने आपण टी-20 मध्ये सध्या जगात सर्वोत्तम असल्याचे सिध्द केले आहे. एकतर भारतीय संघाने गेले सलग 10 सामने जिंकले आहेत. गेल्या सलग 7 द्विपक्षीय मालिका भारतीय संघाने जिंकल्या आहेत.

यातही विशेष म्हणजे आपण आॕस्ट्रेलियाला आॕस्ट्रेलियात, न्यूझीलंडला न्यूझीलंडमध्ये, वेस्ट इंडिजला वेस्ट इंडीजमध्ये, इंग्लंडला इंग्लंडमध्ये, दक्षिण आफ्रिकेला दक्षिण आफ्रिकेत मालिकेत मात दिली आहे.

गेल्या तीन वर्षातील भारताची ही कामगिरी असून या काळात इतर कोणत्याही संघाची अशी कामगिरी राहिलेली नाही.

अर्थात या यशाने विराट कोहलीच्या (Virat Kohli) शिरपेचातसुध्दा तुरा खोवला आहे. आॕस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिकेत टी-20 मालिका जिंकणारा विराट कोहली हा पहिलाच कर्णधार ठरला.

एवढेच नाही तर आॕस्ट्रेलियात कसोटी, वन डे आणि टी 20 मालिका जिंकणारा तो पहिलाच आशियायी कर्णधार ठरला आहे.

तिन्ही प्रकारच्या क्रिकेटच्या मालिका परदेशात जिंकणाऱ्या कर्णधारांमध्ये कोहलीसोबत फाफ डू प्लेसीस (द. आफ्रिका), ग्रॕमी स्मिथ (द. आफ्रिका), रिकी पोंटींग (न्यूझीलंड), मिसबा उल हक (पाकिस्तान), केन विल्यमसन (न्यूझीलंड) व राॕस टेलर हे आहेत पण या सर्वांत विराट कोहली उजवा आहे तो यासाठी की आॕस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका अशा तीन वेगवेगळ्या देशात तिन्ही प्रकारच्या क्रिकेटच्या मालिका जिंकणारा तो एकमेव कर्णधार आहे. मिसबा उल हकने झिम्बाब्वे व बांगलादेशात तिन्ही प्रकारच्या मालिका जिंकल्या आहेत.

परदेशात तिन्ही प्रकारच्या क्रिकेटच्या मालिका जिंकणारे कर्णधार असे..
1) विराट कोहली (भारत)- आॕस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, श्रीलंका
2) मिसबा उल हक (पाकिस्तान)- झिम्बाब्वे व बांगलादेश
3) फाफ डू प्लेसीस (द. आफ्रिका)- आॕस्ट्रेलिया
4) ग्रॕहम स्मिथ (द. आफ्रिका)- वेस्ट इंडिज
5) रिकी पोंटींग (आॕस्ट्रेलिया)- न्यूझीलंड
6) केन विल्यम्सन (न्यूझीलंड)- झिम्बाब्वे
7) रॉस टेलर (न्यूझीलंड)- झिम्बाब्वे

भारतीय संघाचे टी-20 मधील वर्चस्व दाखवणारी आणखी एक बाब म्हणजे, 190 पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करुन सर्वाधिक 7 सामने भारतानेच जिंकले आहेत. एवढ्या मोठ्या धावसंख्येचा एवढ्या सामन्यांमध्ये यशस्वी पाठलाग कुणीच केलेला नाही. भारतानंतर इंग्लंडने 5, आॕस्ट्रेलियाने 4, वेस्ट इंडिजने 3 टी-20 सामने 190 पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करताना जिंकले आहेत.

ही बातमी पण वाचा : IND vs AUS : विराट कोहलीने लावला स्कूप शॉट, तर एबी डिव्हिलियर्सने दिली एक मजेदार प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER