विविध मागण्यांसाठी शिक्षकांची कोल्हापूर ते बारामती पायी दिंडी

विविध मागण्यांसाठी शिक्षकांची कोल्हापूर ते बारामती पायी दिंडी

कोल्हापूर :  राज्यातील सर्व शाळांना नियमानुसार अनुदान वितरणाचा निर्णय शासनाने घ्यावा, विनाअनुदानित व टप्पा अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २० टक्के (20%) व त्यापुढील देय टप्प्याप्रमाणे तत्काळ पगार सुरू करा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने ‘कोल्हापूर, सांगली ते बारामती’ (Kolhapur to Baramati) अशी  पायी दिंडी शिक्षकदिनापासून सुरू केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांना अनुदानासाठी साकडे घालण्यासाठी ही दिंडी काढत आहोत, असे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी सांगितले.

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्हा (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने सदर आंदोलनाचे नियोजन केले आहे. जगदाळे हे गेल्या चार वर्षांपासून विनाअनुदानितच्या मागण्यांसाठी अनवाणी फिरत आहेत. या दिंडीतही ते अनवाणी सहभागी झाले आहेत. त्यांच्या पायाला फोड आले असून वेदना होत आहेत. तरीही मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आता माघार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या पायी दिंडीत मराठवाडा विभागाचे कार्याध्यक्ष वैजनाथ चाटे, पंकज कळसकर, दीपक वडमारे, मधुकर बडे, संतोष राठोड आणि कोल्हापूर विभागातील कृती समितीचे सावता माळी, एस. पी. पाटील, पी. आर. पाटील, किरण नाईक, उत्तम जाधव आदी शिक्षक सहभागी झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER