परभणी : शिक्षकांनी घरूनच ऑनलाइन शिक्षण द्यावे – जिल्हाधिकारी

Teachers should impart online education

परभणी : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाचवी ते नववीचे वर्ग तसेच अकरावीचे वर्ग २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले. या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. यावर जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी शिक्षकांनी शाळेत येण्याची आवश्यकता नाही. शिक्षकांनी शाळेऐवजी घरूनच ऑनलाइन साधनांचा वापर करून अध्यापनाचे कामकाज करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

शनिवारी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शाळा तात्पुरत्या बंद ठेवाव्या, या आदेशाबाबत शिक्षकात संभ्रमावस्था निर्माण झाली होती. याबाबत विचारणा केली असता, शिक्षकातील संभ्रमही त्यांनी दूर केली. शिक्षकांनी शाळेत उपस्थित न राहता घरूनच ऑनलाइन पद्धतीने शिक्षण द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. कोरोनाचा वाढता आलेख पाहता जिल्हा प्रशासनाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER