शिक्षकनेते मिरजकर यांचा 1 मार्च ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते अमृतमहोत्सवी सत्कार

Vishwanath Mirajkar - Hasan Mushrif

सांगली : शाळा शिक्षकांच्या न्याय प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी संघटित आणि सातत्याने काम करणार्‍या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने 1 मार्च रोजी अंकलखोप (ता. पलुस ) शिक्षक समितीचे राज्य नेते विश्वनाथ मिरजकर यांच्या अमृतमहोत्सवी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ पालकमंत्री जयंत पाटील , शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, गृहराज्य मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांची प्रमुख उपस्थितीतीत हा सत्कार होणार आहे. या कार्यक्रमाचे स्वागताक्ष्यक्ष म्हणून कृषी राज्य मंत्री डॉ. विश्वजित कदम हे असल्याची माहीती समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी बुधवारी पत्रकारांना दिली.

यावेळी राज्य नेते विश्वनाथ मिरजकर, नाना जोशी, भाई चव्हाण, मिरजकर गौरव समितीचे अध्यक्ष किरणराव गायकवाड, सचिव शशिकांत भागवत, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड, जिल्हा नेते किसनराव पाटील, राज्य संघटक सयाजी पाटील उपस्थित होते. शिक्षण व्यवस्थेची सद्यस्थिती व संघटनांची भूमिका या विषयावर इंद्रजीत देशमुख हे मार्गदर्शन करणार आहेत.

ही बातमी पण वाचा : ‘ठाकरे’ सरकारकडून शेतकऱ्यांना दुसरी आनंदाची बातमी उद्याच मिळणार

शिंदे म्हणाले, शिक्षकांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे काम समितीने केले आहे. दर्जेदार शिक्षण व गुणवत्ता वाढ यासाठी समितीच्या पदाधिकार्‍यांसह सभासदांचा कायमच आग्रह राहीला आहे. शिक्षण सेवक मानधन, एमएससीआयटी आदी प्रश्नांची यशस्वी सोडवणूक केली आहे. अजूनही शिक्षकांचे प्रश्न आहेत. त्यामध्ये बदल्यांचे चुकीचे धोरण, बदल्यांमध्ये झालेला अन्याय, शिकवण्यापेक्षा इतर कामांचा वाढलेला बोजा या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी समिती सध्या प्रयत्नशिल आहे. समितीच्या स्थापनेपासुन समितीत काम करीत शिक्षकांच्या प्रत्येक प्रश्नासाठी लढा देणारे, अनेक मोर्चे, निदर्शने, बैठका याचे नेतृत्व करीत शासन दरबारी शिक्षकांची भूमिका आक्रमकपणे मांडणारे नेते विश्वनाथ मिरजकर यांचा 75 वाढदिवस आहे. त्या निमित्ताने राज्य शिक्षक समितीच्यावतीने मिरजकर यांचा सत्कार होणार आहे. त्या निमित्ताने मिरजकर यांच्या गौरवगंथाचेही प्रकाशन केले जाणार आहे.


Web Title : Amrit Mahotsav Satkar

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Sangli City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Mumbai City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)