शिक्षकदिनी आज शिक्षक पाळणार शोक दिन

Teacher's Day

मुंबई : राज्य सरकारने आज शिक्षक दिनी (Teachers’ Day) थँक्स अ टीचर हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु राज्यातील शिक्षकांना सरकार न्याय देत नसल्याने शिक्षकांचे बळी जाऊ लागले आहेत. शिक्षकांना न्याय द्यावा, यासाठी शिक्षक भारती संघटनेने शिक्षकदिनी निषेध आणि शोक दिन पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यार्थ्यांनी समाज माध्यमांचा वापर करत आपल्या शिक्षकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करावी, अशी सरकारची अपेक्षा आहे. परंतु धुळ्यात नुकतेच दोन शिक्षकांनी आत्महत्या केल्या. विनाअनुदानामुळे पगार नसल्याने हजारो शिक्षक वैफल्याने ग्रासले आहेत. सरकारने ठरल्याप्रमाणे अनुदान सुरू केले असते, तर ती खरी कृतज्ञता ठरली असती, असे शिक्षक भारतीने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER