मंत्र्यांच्या ताब्यातील महापालिकेतील शिक्षकांचा शिक्षक दिनावर बहिष्कार

Boycott

कोल्हापूर :- सातव्या वेतन आयोगाचे लाभ द्या, अन्यथा येत्या पाच सप्टेंबर रोजी होणाऱ्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकू असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्राथमिक शिक्षक समितीचे प्रशासनाधिकारी शंकर यादव यांच्याकडे निवेदन दिले. आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांसोबत गेल्या महिन्यात बैठक झाली. मात्र कार्यवाही काही झाली नाही. पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil), ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) हे महापालिकेतील सत्तारुढ आघाडीचे नेतृत्व करतात. या दोन्ही मंत्र्यांच्या ताब्यातील महापालिकेतील शिक्षकांवर न्याय मागणीसाठी दोन, दोन वर्षे झगडावे लागत आहे. पालकमंत्री पाटील यांनी गेल्या महिन्यात महापालिकेला स्पष्ट सूचना देऊनही अधिकाऱ्यांनी वेतन आयोगाचे लाभ देण्यासंदर्भात कार्यवाही केली नाही अशा तक्रारी शिक्षकांच्या आहेत.

जिल्हा परिषद व खासगी शाळेतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू होऊन दोन वर्षे झाली. शेजारच्या सांगली महापालिकेनेही पालिका शाळेतील शिक्षकांना वेतन आयोगाचे लाभ दिले. मात्र कोल्हापूर महापालिकेतील शिक्षक गेली दोन वर्षे सातव्या वेतन आयोगाच्या लाभासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करीत आहेत. मात्र प्रशासनाकडून त्यांच्या मागण्यांची दखल घेतली नाही. प्रशासनाच्या या भूमिकेच्या निषेधार्थ महापालिका शाळेतील शिक्षकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

MT LIKE OUR PAGE FOOTER