बारावी परीक्षेचा पेपर तपासणीचा तिढा सुटला

कोल्हापूर : यंदा बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणी कामावर बहिष्कार टाकण्याच्या कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने पर्यायी व्यवस्था केली आहे. यासाठी शिक्षकांची टीम तयार ठेवल्याचे बोर्डाचे विभागीय सचिव एस. एम. आवारी यांनी सांगितले.

आपल्या विविध मागण्यांसाठी राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने दहावी व बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणी कामांवर बहिष्कार घातला आहे. याबाबतचे पत्र कृती समितीने जानेवारी बोर्डाला दिले आहे.

दरम्याने, मंगळवारपासून (दि. १८) बारावीची परीक्षा सुरू झाली आहे. सोमवारपासून शाखानिहाय उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरू होणार आहे.

बारावीच्या परीक्षेचे पेपर तपासणीवर शिक्षकांचा बहिष्कार