गणपती मुर्तीच्या विक्रीदरम्यान शिक्षिकेची पर्स चोरी

Teacher bag stolen during the sale of Ganapati idol

मुंबई : गणपती मुर्ती विक्रीच्या मंडपातून एका शिक्षिकेची पैशांनी भरलेली पर्स चोरी झाल्याची धक्कादायक घटना मानखुर्दमध्ये समोर आली आहे. याप्रकरणी अनोळखी आरोपी विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करुन मानखुर्द पोलीस तपास करत आहेत.

व्यवसायाने शिक्षिका असलेल्या प्रियांका या कुटूंबासोबत मानखुर्दमध्ये राहातात. ट्राँम्बे येथील पालिका शाळेमध्ये त्या शिक्षिका आहेत. नातेवाईकांनी पीएमजीपी काँलनी येथे गणपती मुर्ती विक्रीचा स्टाँल उभारला होता. शाळेला सुट्टी पडल्यान प्रियांकासूद्धा तेथे मदतीला जायच्या. २ सप्टेंबरलासुद्धा त्या स्टॅलवर गेल्या असताना गणपती मुर्ती विक्रीतून मिळालेली ९० हजार ७०० रुपये रक्कम, मोबाईल आपल्या पर्समध्ये ठेऊन त्या मुर्ती विक्रीमध्ये दंग झाल्या. खरेदीसाठी गर्दी झाली असतानाच प्रियांका यांना आपली पर्स चोरी झाल्याचे लक्षात आले. सर्वत्र शोध घेऊनही पर्स न सापडल्याने अखेर प्रियांका यांनी पतीसोबत मानखुर्द पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. यात त्यांनी एका ३० ते ३५ वयोगटातील तरुणावर संशय व्यक्त केला आहे.