विधानपरिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आज मतदान ; 3 डिसेंबरला निकाल

all-party-flag

मुंबई : राज्यातील विधानपरिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघासाठी आज (1 डिसेंबर) मतदान पार पडत आहे. पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे,अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान होणार आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान पार पडेल. तर 3 डिसेंबरला निवडणुकांचे निकाल जाहीर होतील.

राज्यात महाविकास आघाडी (MVA) प्रथमच राज्यस्तरीय एकत्रित निवडणूक तीन पक्ष लढवत आहे. महाविकास आघाडीविरोधात भाजपचे प्रमुख विरोधी पक्ष नेते म्हणून निवडणूक लढवत आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन 1 वर्ष पूर्ण होतानाच तीन पक्षात संघटनात्मक ऐक्य निवडणुकीत आहे का यांचे चित्र स्पष्ट होईल.

तर दुसरीकडे भाजप (BJP) नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. भाजपात नागपूर पदवीधर निवडणूक ही विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांच्यासाठी तर उर्जा मंत्री नितीन राऊत, विजय वड्डेटीवार, अनिल देशमुख यांच्याशी प्रतिष्ठेची निवडणूक असणार आहे.

दरम्यान बिहार निवडणुकीनंतर राज्यात भाजप यशस्वी कामगिरी करत असल्याचे चित्र फडणवीस यांना निर्माण करायचे आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही आलबेल आहे ही दाखवण्याची संधी आघाडीच्या नेत्यांना आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, जयंत पाटील, चंद्रकांत पाटील, अशोक चव्हाण, नितीन राऊत, विजय वड्डेटीवार, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, आशिष शेलार, धनंजय मुंडे, प्रीतम मुंडे, सतेज पाटील, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, विश्वजित कदम, यशोमती ठाकूर या नेत्यांनी प्रचार करत राजकीय आरोपाच्या फेरी झाडल्या आहे. त्यामुळे आता मतदान कुणाच्या पारड्यात पडत हे पाहण्याचे ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER