अहंकारी नेत्याला धडा शिकवा, ज्योतिरादित्य शिंदे यांची कमलनाथवर टीका

Jyotiraditya Shinde & Kamal Nath

भोपाळ : मध्य प्रदेशच्या डबरा मतदारसंघात काँग्रेसचे सुरेंद्र राजेश यांच्यासाठी प्रचार करताना माजी मुख्यमंत्री कमलनाथ भाजपाच्या महिला उमेदवाराला ‘आयटम’ म्हणाले! यानंतर कमळनाथवर टीका करताना भाजपाचे नेते ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले – अहंकारी नेत्याला धडा शिकवण्याची वेळ आली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीसोबतच उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्यो पोटनिवडणुकाही होत आहेत.डबरा मतदारसंघात काँग्रेसकडून सुरेंद्र राजेश उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी आले असताना माजी मुख्यमंत्री कमलनाथ म्हणाले, ”सुरेंद्र राजेश आमचे उमेदवार आहेत. ते सरळ साध्या स्वभावाचे आहेत. ते त्यांच्यासारखे नाहीत, काय आहे त्यांचे नाव? मी त्यांचे काय नाव घेऊ? तुम्ही तर त्यांना माझ्यापेक्षा चांगले ओळखता. तुम्ही मला आधीच सावध करायला पाहिजे होते – ‘काय आयटम आहे’.

भाजपाच्या उमेदवार इमरती देवी माजी आमदार आहेत व ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबतच त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्या कट्टर समर्थक मानल्या जातात.

कमलनाथ यांचे सामंतवादी विचार उघड – शिवराज सिंह चव्हाण

कमलनाथ यांच्या आक्षेपार्ह शेरेबाजीवर टीका करताना मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण म्हणाले – कमलनाथजी इमरती देवी एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीचे नाव आहे जिने मोलमजुरी करुन सुरुवात कामाची सुरुवात केली. आज त्या राष्ट्रउभारणीच्या कामात योगदान देत आहेत. काँग्रेसने मला ‘भुकेला-नग्न’ म्हटले आणि आता एका महिलेसाठी ‘आयटम’ शब्द वापरूला. त्यांचे सामंतवादी विचार उघड झाले आहेत.’

नवरात्रीच्या पवित्र पर्वात नारीची पूजा केली जाते आहे. तुमच्या या शेरेबाजीतून तुमच्या खालच्या दर्जाची मानसिकता दिसते. तुम्ही तुमचे शब्द मागे घ्या आणि इमरती देवी यांच्यासह मध्य प्रदेशच्या सर्व मुलीची माफी मागा, अशी मागणी शिवराज सिंह यांनी केली.

ज्योतिरादित्य शिंदे

कमलनाथ यांच्या वक्तव्यांवर बोलताना भाजपाचे नेते ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, ‘एका गरीब आणि मजूर कुटुंबातून पुढे आलेल्या दलित नेत्या इमरती देवी यांच्यासाठी डबरा येथे आयटम आणि जलेबी असे अत्यंत निंदास्पद आणि आक्षेपार्ह शब्दप्रयोग झाले. यातून कमलनाथ यांची मानसिकता दिसते. महिलांसह संपूर्ण दलित समाजाचा अपमान करणाऱ्या या अहंकारी नेत्याला धडा शिकवण्याची वेळ आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER