
जयपूर : काही दिवसात देशातील प्रत्येक स्टेशनवर केवळ कुल्हडमधूनच चहा देण्यात येईल. हे ‘प्लास्टिक मुक्त भारत’मध्ये रेल्वेचे हे योगदान असणार आहे. या योजनेमुळे हजारो लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, असे रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांनी सांगितले.
ते राजस्थानच्या अलवर येथे ढिगावडा-बांदीकुई रेल्वेमार्गावरील विद्युतीकरण उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. सध्या देशात सुमारे ४०० रेल्वे स्टेशन्सवर कुल्हडमधूनच चहा दिला जातो, अशी माहिती त्यांनी दिली.
आधीच्या काळात रेल्वे स्थानकांत कुल्हडमधूनच चहा दिला जात होता. २०१४ ला केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार आले, तोपर्यंत कुल्हड गायब झाले होते; चहा प्लास्टिकच्या कपात देण्यास सुरुवात झाली होती. खादी ग्रामोद्योग विभागातील लोकांनी रेल्वेसोबत मिळून या कार्याला गती दिली असे गोयल यांनी सांगितलं.
कुल्हडमध्ये चहा पिण्याचा स्वाद वेगळाच असतो. हे पर्यावरणपुरकही आहे. मोदी २०१४ ला सत्तेत आले, तेव्हापासून ते लोकांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत, असे गोयल म्हणालेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला