टीसीएसच्या नफ्यात २४ टक्के वाढ

डिजिटल क्षेत्रात मिळाला दमदार महसूल

tcs1

मुंबई :- टाटा कन्सलटन्सी लिमिटेस (टीसीएस) या आयटी क्षेत्रातील कंपनीच्या नफ्यात दमदार २४ टक्के वाढ झाली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधितील त्यांच्या तिमाहीत ही वाढ झाली आहे. प्रामुख्याने डिजिटल क्षेत्रात कंपनीला दमदार महसूल मिळाला आहे.

टाटा समुहातील टाटा मोटर्सला वाहन क्षेत्रातील मंदीचा फटका बसत आहे. जग्वार लॅण्ड रोव्हरची जागतिक विक्री सातत्याने घटत आहे. यामुळे समूह चिंतेत असला तरी टीसीएसच्या दमदार यशामुळे कंपनीत नवचैतन्य आले आहे.

ऑक्टोबर ते डिसेंबर २०१७ या तिमाहीत कंपनीला 6५३१ कोटी रुपयांचा नफा झाला होता. २०१८ मध्ये हा नफा ८१५० कोटी रुपयांवर आला. डिसेंबरअखेर कंपनीच्या महसुलातही २०.८० टक्क्यांची भरघोस वाढ झाली आहे. कंपनीने ३७,३३८ कोटी रुपयांचा महसूल कमवला आहे. कंपनीच्या डिजिटल व्यवसायातील महसुलात ५२ टक्क्यांची जबरदस्त वाढ झाली आहे. त्यामुळेच एकंदर निकाल चांगले राहीले.